शेतजमिनीच्या माेबदल्यासाठी आत्मबलिदानाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST2021-03-25T04:26:11+5:302021-03-25T04:26:11+5:30
भूमापन क्रमांक व उपविभाग ८०, विजय हणमंत देसाई भूमापन क्र व उपविभाग ८२ मधील आमची शेत जमीन रस्त्याच्या ...

शेतजमिनीच्या माेबदल्यासाठी आत्मबलिदानाचा इशारा
भूमापन क्रमांक व उपविभाग ८०, विजय हणमंत देसाई भूमापन क्र व उपविभाग ८२ मधील आमची शेत जमीन रस्त्याच्या दोन्ही बाजूने गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई या महामार्गासाठी गेल्यामुळे शेतीचे पूर्णपणे नुकसान झाले. आम्हाला शेती करता येत नाही. गेलेल्या जागेचा आत्तापर्यंत शासन व प्रशासन यांच्याकडून कोणत्याही स्वरूपातील मोबदला मिळालेला नाही. या संदर्भात गेल्या महिन्यापूर्वी येथील पाणी संघर्ष समितीने आमची मागणी प्रांताधिकारी व महामार्ग प्राधिकरणाकडे केली होती, परंतु भूमी अभिलेख यांनी कोणतीही तोंडी चर्चा केलेली नाही किंवा लेखी पत्र दिलेले नाही. अशा बिकट परिस्थितीत मुलांचे संगोपन त्यांचे शिक्षण आदी प्रश्न आहेत. आमची दखल शासन व प्रशासनाने २७ मार्चपर्यंत घ्यावी अन्यथा २९ मार्चनंतर आम्ही केव्हाही आत्मबलिदान करणार आहोत, असे शेतकरी अनिल देसाई व विजय देसाई यांनी निवेदनात म्हटले आहे.