माडग्याळ येथील चोरीच्या तपासासाठी उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:25 IST2021-03-15T04:25:48+5:302021-03-15T04:25:48+5:30

माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथे शिवानंद सिद्राम कोरे यांच्या घरात भरदिवसा झालेल्या चोरीचा कसून तपास करावा अन्यथा बेमदुत ...

A warning of a hunger strike to investigate the theft at Madgyal | माडग्याळ येथील चोरीच्या तपासासाठी उपोषणाचा इशारा

माडग्याळ येथील चोरीच्या तपासासाठी उपोषणाचा इशारा

माडग्याळ

: माडग्याळ (ता. जत) येथे शिवानंद सिद्राम कोरे यांच्या घरात भरदिवसा झालेल्या चोरीचा कसून तपास करावा अन्यथा बेमदुत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख व विभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

शिवानंद कोरे यांच्या माडग्याळ अंकलगी मार्गावरील घरात गेल्या दहा दिवसांपूर्वी चोरी झाली होती. रोख दोन लाख रुपये व सोन्या-चांदीची दागिने असा सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला होता. याप्रकरणी उमदी पोलिसांनी एका संशयिताची चौकशी केली; परंतु त्याच्याकडे फारशी माहिती मिळू शकली नाही.

परंतु सशंयित कोरे यांच्या वस्तीवर एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी लगेचच घरातून निघून गेल्याने त्याच्यावर शिवानंद कोरे यांनी संशय व्यक्त केला आहे. मात्र, पोलिसाकडून योग्य तपास होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये गावातील अंबाबाई मंदिरातील दागिन्यांचाही समावेश होता. यामुळे आता ग्रामस्थांनीच या प्रकरणी उपोषणाचा इशारा दिला आहे.

Web Title: A warning of a hunger strike to investigate the theft at Madgyal