रस्ते दुरुस्ती प्रश्नावर आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:32 IST2021-09-16T04:32:59+5:302021-09-16T04:32:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : येथील प्रभाग क्र. १२ मधील अजिंक्यनगर परिसरात ड्रेनेजलाइन टाकल्यामुळे रस्ते खराब झाले आहेत. या ...

A warning of agitation on the question of road repairs | रस्ते दुरुस्ती प्रश्नावर आंदोलनाचा इशारा

रस्ते दुरुस्ती प्रश्नावर आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : येथील प्रभाग क्र. १२ मधील अजिंक्यनगर परिसरात ड्रेनेजलाइन टाकल्यामुळे रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी; अन्यथा महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील नागरिकांनी दिला.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ड्रेनेजसाठी रस्ते खोदले असून, सततच्या पावसामुळे परिस्थिती अजून गंभीर झाली आहे. लोकांना या परिसरातून ये-जा करावी लागत आहे. स्वतःची वाहन दूरवर लावावी लागत आहेत. रस्ते खराब असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. प्रशासनाला वारंवार याबाबत विनंती करूनही रस्ते दुरुस्ती केलेली नाही. महापालिकेकडून वेळकाढूपणा सुरू आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, तर आंदोलन करण्यात येईल.

यावेळी परिसरातील प्रकाश जामदार, बापू हिंगमिरे, नितीन यादव, भिकू काळोखे, संकेत निकम, दिलीप घोरपडे, बिरू यमगर, सचिन घोडके, सुमित पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: A warning of agitation on the question of road repairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.