गोदामे बांधण्यात येणार : झेडपी कृषी समितीच्या बैठकीत निर्णय

By Admin | Updated: December 2, 2014 00:13 IST2014-12-01T23:43:50+5:302014-12-02T00:13:15+5:30

विटा, पलूस, कडेगाव येथे शेती अवजारे ठेवण्यासाठी गोदामे बांधण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

Warehouse to be built: ZP Agriculture Committee meeting | गोदामे बांधण्यात येणार : झेडपी कृषी समितीच्या बैठकीत निर्णय

गोदामे बांधण्यात येणार : झेडपी कृषी समितीच्या बैठकीत निर्णय

सांगली : जिल्हा परिषद स्वीय निधीतून शेतकऱ्यांना उपयोगी अवजारे खरेदीची मूळ तरतूद ४८ लाख चार हजारांची होती. यामध्ये दुपटीने वाढ करून ती ९७ लाख नऊ हजार करण्याचा निर्णय कृषी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच विटा, पलूस, कडेगाव येथे शेती अवजारे ठेवण्यासाठी गोदामे बांधण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
कृषी समिती सभापती मनीषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची बैठक झाली. यावेळी कृषी अवजारांची संख्या वाढविण्याची सदस्यांनी मागणी केली. त्यानुसार मनीषा पाटील म्हणल्या की, चाप कटरसाठी २५ लाख, ताडपदरी २२ लाख ९० हजार, स्प्रे पंप बॅटरीसाठी दहा लाख ५० हजारांच्या वाढीव निधीची तरतूद करण्यात येईल. वाढीव तरतुदीमुळे कृषी अवजारांची खरेदी एक कोटीपर्यंत होणार असून सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात येईल. याचबरोबर पलूस, कडेगाव तालुक्यात कृषी विभागाचे साहित्य ठेवण्यासाठी गोदाम बांधण्यात येणार आहे. तसेच विटा येथेही गोदाम बांधण्यात येणार असून त्यासाठी पंधरा लाखांची तरतूद आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गाळेधारकांकडून व्यावसायिक दराने भाडे आकारण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)


‘विशेष घटक’ला लाभार्थी मिळेना
विशेष घटक योजनेतून जिल्ह्यासाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर आहे. दीड हजार लाभार्थींना लाभ दिला जाणार आहे. परंतु, केवळ २१७ लाभार्थीच मिळाल्यामुळे उर्वरित लाभार्थीं अधिकाऱ्यांना शोधावे लागणार.
राज्य शासनाने ट्रॅक्टरची योजना बंद केली होती. ही योजना पुन्हा सुरु करून २४ ट्रॅक्टरना मंजुरी मिळाली आहे.

Web Title: Warehouse to be built: ZP Agriculture Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.