शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, एका प्रभागात २३ ते २८ हजार लोकसंख्या; सर्वात मोठा अन् लहान प्रभाग कोणता.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:50 IST

२०११ च्या जनगणनेवर प्रभागाची रचना

सांगली : बहुप्रतिक्षित महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी जाहीर झाली. या नव्या रचनेत लोकसंख्येनुसार सह्याद्रीनगरचा प्रभाग (क्रमांक ९) सर्वांत मोठा तर सांगलीवाडीचा प्रभाग (१३) सर्वांत लहान ठरला आहे. इतर प्रभागांत साधारण २३ ते २८ हजार लोकसंख्या आहे. महापालिकेने २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्या गृहित धरून प्रभागांची रचना केली आहे. या लोकसंख्येत आणखी चार ते पाच हजारांची वाढ होऊ शकते.सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात एकत्रित २० प्रभाग आहेत. त्यातील १८ प्रभाग चार सदस्यीय तर २ प्रभाग तीन सदस्य असणार आहेत. ही प्रभाग रचना २०११ च्या लोकसंख्येवर आधारित आहे तेव्हा शहराची लोकसंख्या ५ लाख २ हजार ७९३ इतकी होती. प्रभाग रचनेचा मुख्य आधार लोकसंख्या आहे. प्रारुपमध्ये २४ ते २८ हजार लोकसंख्या असलेला एक प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक नऊमध्ये सर्वाधिक २८ हजार २६८ लोकसंख्या आहे तर सर्वांत कमी लोकसंख्या सांगलीवाडीच्या प्रभाग १३ मध्ये १६ हजार ९५३ इतकी आहे.

कसा आहे सर्वांत मोठा प्रभाग ९प्रभाग क्रमांक नऊची व्याप्ती मोठी आहे. मार्केट यार्डापासून सुरू होणारा या प्रभागात वसंत कॉलनी, गेस्टहाऊस, सरस्वती कॉलनी, पोलीस मुख्यालय, सह्याद्रीनगर, मनिषा टेस्ट बँक कॉलनी, क्लासिक पार्क, जवाहर हौसिंग सोसायटी, गांधी कॉलनी, राजीवनगर, समर्थ कॉलनी, अभयनगर, समाधान कॉलनी, गीतासाई कॉलनी, आरवाडे पार्क, आनंद पार्क या परिसराचा समावेश आहे.

सर्वांत लहान प्रभागसांगलीवाडीतील कदमवाडी रस्त्यापासून या प्रभागाची सुरुवात होते. इस्लामपूर रोड, विठ्ठलमंदिर, मंगोबा मंदिर, बाळूमामा मंदिर, राणाप्रताप चौक, समडोळी रस्ता, दत्तनगर, बौद्ध वसाहत, चर्मकार वसाहत, साईनगरपर्यंत प्रभागाची व्याप्ती आहे.

प्रभागाची लोकसंख्याप्रभाग क्रमांक - लोकसंख्या - अनुसूचित जाती - अनुसूचित जमाती१ - २८०५६ - ४०९१ - १७२२ - २५०३६ - ४७३१ - २००३ - २७३७५ - ५४६४ - ८२४ - २६८७९ - २५०८ - ७७५ - २५८८३ - २९४२ - २७३६ - २४२८७ - १३३६ - २८७ - २४१०५ - ४६०४ - १८८८ - २५५९६ - ४६६१ - २७०९ - २८,२६८ - २५२७ - २३२१० - २५७८१ - ६१०८ - ८७११ - २३३७५ - ४२९० - १०३१२ - २५५९८ - ३२४६ - ९९१३ - १६९५३ - १९८७ - १४३१४ - २७६४९ - ३८२३ - २०४१५ - २४४२७ - ३१६६ - ६३१६ - २७३४८ - २०३३ - ११७१७ - २४९३८ - १७३० - १९९१८ - २७१३६ - ५२३२ - ३९११९ - २४१८२ - ३७८९ - २५२२० - १९९२१ - ४५९२ - ३१६

एकूण सदस्य आणि आरक्षण

  • एकूण सदस्य : ७८
  • अनु. जाती : ११
  • अनु. जमाती : १
  • नागरिक मागास प्रवर्ग : २१
  • सर्वसाधारण : ४५

महिलांसाठी आरक्षित पदे

  • एकूण महिला सदस्य : ३९
  • अनु. जाती : ६
  • अनुसूचित जमाती : १
  • ओबीसी : ११
  • सर्वसाधारण : २२

अनुसूचित जाती प्रवर्गात प्रभाग १० मोठाअनसूचित जाती प्रवर्गासाठी ११ प्रभाग राखीव आहेत. त्यात सांगलीतील टिंबर एरियाच्या प्रभाग १० मध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. या प्रभागात ५ हजार ९४२ लोकसंख्या आहे. त्याखालोखाल कुपवाडमधील प्रभाग ३ मध्ये ५ हजार ५६७, शामरावनगरच्या प्रभाग १८ मध्ये ५,३३२ लोकसंख्या आहे. अन्य सहा प्रभागांत ४ हजार ते पाच हजारांदरम्यान लोकसंख्या असून, सर्वांत कमी मिरजेतील प्रभाग-६ मध्ये १,३३६ लोकसंख्या आहे.

अनु. जमातीत प्रभाग १८ आघाडीवरअनुसूचित जमातीसाठी एक प्रभाग राखीव आहे. गतवेळी मिरजेतील प्रभाग २० मध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण होते. या प्रभागात ३१६ इतकी लोकसंख्या आहे; पण सांगलीतील प्रभाग १८ मध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३९१ इतकी आहे. सर्वांत कमी लोकसंख्या प्रभाग १५ मध्ये आहे.