बिनकामाचे मोबाईल करायचे काय? अंगणवाडी सेविकांनी नाकारले स्मार्ट फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:11+5:302021-09-05T04:30:11+5:30

सांगलीत जिल्हा परिषदेत अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन केले. यावेळी अंजना पाटील, दीपा कुलकर्णी, भारती हेगडे, भाग्यश्री पाचोरे, अनिता ...

Want to do free mobile? Anganwadi workers reject smart phones | बिनकामाचे मोबाईल करायचे काय? अंगणवाडी सेविकांनी नाकारले स्मार्ट फोन

बिनकामाचे मोबाईल करायचे काय? अंगणवाडी सेविकांनी नाकारले स्मार्ट फोन

सांगलीत जिल्हा परिषदेत अंगणवाडी सेविकांनी मोबाईल वापसी आंदोलन केले. यावेळी अंजना पाटील, दीपा कुलकर्णी, भारती हेगडे, भाग्यश्री पाचोरे, अनिता कोरडे, शरीफा मुजावर, रेखा पाटील आदी उपस्थित होेते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाभरात मोबाईल वापसी आंदोलन केले. याअंतर्गत जिल्हा परिषदेत महिला व बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांकडे २४० मोबाईल सुपूर्द केले.

आंदोलनात अंजना पाटील, दीपा कुलकर्णी, भारती हेगडे, भाग्यश्री पाचोरे, अनिता कोरडे, शरीफा मुजावर, रेखा पाटील, सुनंदा मिरजकर, सविता चौगुले, कांचन कोळी, सुलोचना चौगुले, निर्मला पाटील, अंजना चट्टेकरी, रूपा भंडारे, पुष्पा पाटील, गोदाबाई लोहार, लता पाटील आदींनी भाग घेतला. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. मिरज पंचायत समितीतही प्रकल्पाधिकारी मनीषा साळुंखे यांच्याकडे मोबाईल परत दिले. जिल्हाभरात त्या-त्या तालुक्यांतही सेविकांनी मोबाईलवर काम करण्यास नकार दिला. आंदोलकांच्या मागण्या अशा : मिनी अंगणवाड्या मोठ्या कराव्यात, मदतनीसांच्या रिक्त जागा भराव्यात, त्यांना सेविकापदी पदोन्नती मिळावी, मोबाईलवर मराठी भाषेत पोषण आहार माहिती भरण्यासाठी परवानगी द्यावी.

Web Title: Want to do free mobile? Anganwadi workers reject smart phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.