वांगीत कदम यांच्या वाढदिनी वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:51+5:302021-06-16T04:35:51+5:30
लोकमत न्युज नेटवर्क वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातील डॉ. पतंगराव ...

वांगीत कदम यांच्या वाढदिनी वृक्षारोपण
लोकमत न्युज नेटवर्क
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातील डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारक आवारामध्ये मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कारखाना परिसरातील स्वच्छता केली. यावेळी महेंद्र लाड, बाजीराव पाटील, राजू इनामदार, कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम उपस्थित होते. आमदार मोहनराव कदम म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या विषाणू संसर्गाने संपूर्ण जगाला हैराण केले आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काही कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अशा परिस्थितीमध्ये माझा वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे आपण कारखान्यातील सर्वांनी वृक्षारोपण, परिसर स्वच्छता अभियान राबिवले याचा मला सार्थ अभिमान वाटतो. पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे, त्यांची जोपासना करणे व आपला परिसर सदैव स्वच्छ ठेवणे ही काळाची गरज आहे.