सागाव परिसरात वीज मीटरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:27 IST2021-03-16T04:27:20+5:302021-03-16T04:27:20+5:30

पुनवत : महावितरण कंपनीच्या सागाव कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावातील असंख्य ग्राहकांना कोटेशन भरूनही अनेक महिने उलटले तरीही घरगुती मीटर मिळालेले ...

Waiting for electricity meter in Sagav area | सागाव परिसरात वीज मीटरची प्रतीक्षा

सागाव परिसरात वीज मीटरची प्रतीक्षा

पुनवत :

महावितरण कंपनीच्या सागाव कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावातील असंख्य ग्राहकांना कोटेशन भरूनही अनेक महिने उलटले तरीही घरगुती मीटर मिळालेले नाही. परिणामी या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महावितरणच्या सागाव कार्यालया अंतर्गत सागाव, ढोलेवाडी, कणदूर, पुनवत, खवरेवाडी, शिराळे खुर्द, फुपेरे आदी गावे येतात. या गावातील असंख्य ग्राहकांनी महावितरणकडे घरगुती कनेक्शनसाठी नोंदणी केली आहे. ऑनलाइन अर्ज व कोटेशनही भरले आहे. मात्र हे सर्व करूनही या ग्राहकांना महावितरणकडून नवीन मीटर मिळालेले नाहीत.

अनेक ग्राहक सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत आहेत. पैसे भरूनही मीटरचा पत्ता नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. घरात वीज नसल्याने गैरसोय होत आहे. सागाव कार्यालयात विचारले असता मीटर उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे .

महावितरण कंपनीने आपले ग्राहक वाढवायचे असतील तर नवीन ग्राहकांना मीटर त्वरित देणे गरजेचे आहे. मात्र त्यांची डोळेझाक सुरूच आहे.

चौकट

खासगी मीटरने आर्थिक भुर्दंड

महावितरण कंपनीकडून मीटर मिळत नसल्याने ग्राहकांजवळ खासगी मीटर घेण्याचा पर्याय आहे. पण यामध्ये त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महावितरणने सर्व नवीन ग्राहकांना मीटर त्वरित द्यावेत, अशी मागणी सर्व नागरिकांतून होत आहे.

Web Title: Waiting for electricity meter in Sagav area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.