शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेतच्या मृत्यूच्या अहवालाची प्रतीक्षा-कोठडीत मारले.. आंबोलीत जाळले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:26 IST

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही.

ठळक मुद्देपंधरा दिवसांचा कालावधी लागणार : मिरजेत मृतदेहाची तपासणी; कारणाचे रहस्य कायम-मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी अनिकेतचा मृतदेह मिरज शासकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडे सुपूर्द करण्यात आला होता

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचे रहस्य अद्यापही उलगडलेले नाही. त्याचा मृतदेह मिरजेच्या शासकीय महाविद्यालयाकडील शरीरशास्त्र विभागात तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे. त्याचा अहवाल दोन आठवड्यात प्राप्त होईल, असे सांगण्यात येत आहे. सीआयडीलाही त्याचा मृत्यू कशाने झाला, याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला लूटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले या सहाजणांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने १ जानेवारी २०१८ पर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. अनिकेत खून प्रकरणात आतापर्यंत सातजणांना अटक झाली आहे.सीआयडीने संशयितांचे कॉल डिटेल्स मागविले होेते. घटनेच्या काळात संशयितांशी संपर्क केलेल्या सर्वांना सीआयडीने बोलावून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५४ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. सीआयडीने डीएनए चाचणीही केली होती. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून मृतदेह हा अनिकेतचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी अनिकेतचा मृतदेह मिरज शासकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडे सुपूर्द करण्यात आला होता या विभागाकडून विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यांचा अहवाल पंधरा दिवसात प्राप्त होण्याची शक्यता आहे. या अहवालाची सीआयडीलाही प्रतीक्षा आहे.कोथळे कुटुंबीय उज्ज्वल निकमना भेटणारअनिकेत कोथळे खून प्रकरणात सरकारच्यावतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीआयडीकडून आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अ‍ॅड. निकम खटल्याचे कामकाज हाती घेतील, असे सांगण्यात येत आहे. शनिवारी अ‍ॅड. निकम हे मिरजेत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. यावेळी कोथळे कुटुंबीय अ‍ॅड. निकम यांची भेट घेणार असल्याचे आशिष कोथळे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगलीPolice Stationपोलीस ठाणे