शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
2
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
3
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
4
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
5
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
6
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
7
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
8
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
9
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
10
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
11
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
12
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
13
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
14
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
15
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
16
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
17
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
18
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Corporation Election: मतदारवाढ ३० हजाराची, प्रभागात घट दीड हजाराची; मतदार कुठे गेले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:41 IST

गत निवडणुकीच्या तुलनेत अनेक ठिकाणी कमी मतदार

शीतल पाटीलसांगली : महापालिकेच्या २०१८ च्या निवडणुकीनंतरच्या सहा वर्षांत शहरातील मतदारसंख्येत तब्बल ३० हजारांची वाढ झाल्याचे प्रारूप मतदार यादीतून स्पष्ट झाले; पण प्रत्यक्षात काही प्रभागांमध्ये १५०० ते दोन हजार मतदारांची घट झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘यामुळे हे मतदार कुठे गेले?, यादीतून नावे कशी हटली? मतदारसंख्या वाढतेय म्हणतात, मग प्रभागात घट कशी?’ असे प्रश्न उमेदवार आणि नागरिकांना पडले आहेत. २०१८च्या तुलनेत शहराची लोकसंख्या, स्थलांतर, नवीन वसाहतींमुळे मतदारसंख्येत वाढ होणे स्वाभाविक असताना काही प्रभागांमधील गणित मात्र उलट झाले आहे.महापालिकेने यंदाच्या निवडणुकीसाठी नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली. या यादीनुसार महापालिका निवडणुकीसाठी ४ लाख ५४ हजार मतदारसंख्या निश्चित झाली आहे. २०१८ च्या निवडणुकीपेक्षा यंदा ३० हजारांनी मतदारांची वाढ झाली. ही वाढ ग्राह्य धरली तर प्रत्येक प्रभागात हजार ते दीड हजार मतदारांची वाढ होणे अपेक्षित होते. उलट प्रभागनिहाय मतदारसंख्येतील घसरण दीड ते दोन हजारांपर्यंत पोहोचत आहे. यादी तयार करण्यातील त्रुटी, स्थलांतरित मतदारांचे पत्ते अपडेट न होणे, मृत मतदारांची नावे काट्यातून काढण्यात झालेली नियमबाह्य गडबड, अथवा पुनर्आखणीतील तांत्रिक गोंधळ अशा कारणांमुळे मतदारसंख्या कमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहेत.

‘एका बाजूला शहरात ३० हजार नवीन मतदार वाढल्याचे सांगितले जाते आणि दुसऱ्या बाजूला आमच्या प्रभागात दोन हजार मतदार कमी दाखवले जातात. हा आकड्यांचा जादूई खेळ कशासाठी?’ असा थेट आरोप होत असून, या घोळावरून निवडणूकपूर्व राजकीय वातावरण तापले आहे. नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या कोअर टीमकडून मतदार याद्या पडताळून पाहण्याचे काम वेगात सुरू आहे. याद्यांमधील विसंगतीमुळे अनेकांनी निवडणूक विभागाकडे पुनर्तपासणीची मागणीही केली आहे. दीड ते दोन हजार मतदार एखाद्या प्रभागात निकाल बदलू शकतात, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

प्रभाग ७ मध्ये १९०० मतदार कमीमिरजेतील प्रभाग सातमध्ये २०१८ साली २४ हजार १०५ मतदार होते. यंदाच्या मतदार यादीत २२१९७ मतदार आहेत. मतदारांची संख्या १९०७ ने कमी झाली आहे. याबाबत माजी नगरसेवक प्रसाद मदभावीकर यांनी महापालिकेकडे हरकतही दाखल केली आहे. मतदार गेले कुठे, असा सवाल करून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

प्रभाग १० मध्येही गोंधळवडर काॅलनीतील प्रभाग १० मध्येही मागील निवडणुकीत २५ हजार मतदार असताना यंदाच्या यादीत मात्र २३ हजार ४० मतदार आहेत. दोन हजार मतदार गायब असल्याचा आरोप माजी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी केला. प्रभागाची सीमा गत निवडणुकीप्रमाणेच आहे. मग प्रभागातील मतदारांची संख्या कमी कशी झाली? उलट मतदारवाढ होण्याची गरज होती, असेही त्या म्हणाल्या.शहरात वाढलेली संख्या कुठे गेली?सात वर्षांत मतदारसंख्या वाढली असताना खणभागातील प्रभाग १६मध्ये ५०० मतदार कमी झाले असल्याचे माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी सांगितले; तर प्रभाग १८ मध्ये २०१८ व २०१५ ची मतदारसंख्या जवळपास समानच आहे. तिथे कुठलीच वाढ अथवा घट दिसत नाही. मग शहरात वाढलेली मतदारसंख्या कुठे गेली, असा सवाल माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनी उपस्थित केला.