विठ्ठलापूरला खासगी सावकाराची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST2021-06-26T04:20:11+5:302021-06-26T04:20:11+5:30

दत्तात्रय भोसले यांनी वडिलांच्या उपचारासाठी दोन टक्के महिना व्याजदराने एक लाख रुपये नवनाथ काळेल याच्याकडून घेतले होते. त्यानुसार दोन ...

Vitthalapur beaten by a private lender | विठ्ठलापूरला खासगी सावकाराची मारहाण

विठ्ठलापूरला खासगी सावकाराची मारहाण

दत्तात्रय भोसले यांनी वडिलांच्या उपचारासाठी दोन टक्के महिना व्याजदराने एक लाख रुपये नवनाथ काळेल याच्याकडून घेतले होते. त्यानुसार दोन लाख वीस हजार परत देतो, असे सांगितले होते. परंतु काळेलने पंधरा लाखांची मागणी केली. पैसे परत कर किंवा जमीन नावावर करून दे, असे म्हणून नवनाथ काळेल, संदीपान बाड, कमलाकर काळेल यांनी भोसले यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार तम्मा चोरमले करीत आहेत.

चौकट

पोलिसांवर राजकीय दबाव

सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून या गावात गेल्या दोन दिवसांत तीनवेळा दोन गट हातात काठ्या घेऊन समोरासमोर आले. पोलीस तीनवेळा तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पण पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत एकालाही अटक केलेली नाही. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने कारवाई होत नाही, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: Vitthalapur beaten by a private lender