दरडग्रस्तांच्या मदतीसाठी धावला विटेकर ग्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:26 IST2021-07-29T04:26:50+5:302021-07-29T04:26:50+5:30

विटा : गेल्या आठवड्यात कोयनानगर परिसरातील डोकावळे गावाशेजारी दरड कोसळल्याने तात्पुरते पुनर्वसन केलेल्या ३०० लोकांच्या मदतीसाठी विटा येथील तरूण ...

Vitekar Group rushed to the aid of the afflicted | दरडग्रस्तांच्या मदतीसाठी धावला विटेकर ग्रुप

दरडग्रस्तांच्या मदतीसाठी धावला विटेकर ग्रुप

विटा : गेल्या आठवड्यात कोयनानगर परिसरातील डोकावळे गावाशेजारी दरड कोसळल्याने तात्पुरते पुनर्वसन केलेल्या ३०० लोकांच्या मदतीसाठी विटा येथील तरूण सरसावले. आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप व राजलक्ष्मी मित्रपरिवाराने त्यांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दरडग्रस्त लोकांचा थंडीपासून बचाव होण्यासाठी युवकांनी तेथील लोकांना स्वेटर, ब्लॅँकेट व खाद्यपदार्थांचे वाटप केले.

कोयनानगरजवळ असलेल्या डोकावळे गावाशेजारी अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती. त्यामुळे तेथील सुमारे ३०० लोकांना शाळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. तेथेच त्यांची राहण्याची सोय करण्यात आली होती. परंतु, त्यांचे साहित्य घरातच राहिल्याने त्यांना झोपण्यासाठी ब्लॅँकेट व थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरची आवश्यकता होती.

त्यामुळे आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे माधव रोकडे, अमित भोसले, विकास जाधव, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे, शंकर बुधवाणी, मिकी सिंधी, रूपेश आहुजा, विनोद पाटील, पांडुरंग पवार, संभाजी होगले, जगन्नााथ पाटील, रोहित कुमठेकर, धाबुगडे यांच्यासह युवकांनी डोकावळेवासीयांना ब्लॅँकेट, स्वेटर, कानटोप्या, बिस्कीट, कपडे, सॅनिटायझर्स, आदी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चौकट :

मदतीचे आवाहन...

कोयनानगरसह कोकणात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. अनेकांचे पुनर्वसन करावे लागले. त्या लोकांना एक हात मदतीचा देणे गरजेचे आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी दरड व महापूर बाधितांसाठी मदत द्यावी, असे आवाहन आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे माधव रोकडे यांनी केले आहे.

फोटो - २८०७२०२१-विटा-मदत : विटा येथील युवकांनी कोयनानगरमधील दरडग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून या बाधितांना मदतीचा हात दिला.

Web Title: Vitekar Group rushed to the aid of the afflicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.