विट्यातील कलाकृती द बॉम्बे आर्टमधील प्रदर्शनात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST2021-04-04T04:27:14+5:302021-04-04T04:27:14+5:30
फोटो : ०३०४२०२१-विटा-कलाकृती : विटा येथील कैलास कुंभार यांनी दगडापासून तयार केलेल्या मदर आणि चाइल्ड या कलाकृतीची राष्ट्रीय कला ...

विट्यातील कलाकृती द बॉम्बे आर्टमधील प्रदर्शनात अव्वल
फोटो : ०३०४२०२१-विटा-कलाकृती : विटा येथील कैलास कुंभार यांनी दगडापासून तयार केलेल्या मदर आणि चाइल्ड या कलाकृतीची राष्ट्रीय कला प्रदर्शनात निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : द बॉम्बे आर्ट सोसायटीच्यावतीने आयोजित कला प्रदर्शनात येथील कैलास नामदेव कुंभार यांच्या कलाकृतीची निवड करण्यात आली. देशभरातून सहभागी झालेल्या ३५०० कलाकारांच्या कलाकृतीत ही कलाकृती अव्वल ठरली आहे.
द बॉम्बे आर्ट सोसायटीचे वार्षिक प्रदर्शन कला रसिकांसाठी पर्वणी असते. कोरोनामुळे यंदा ऑनलाईन माध्यमाचा अवलंब केला होता. या प्रदर्शनातून राष्ट्रीय प्रदर्शनासाठी विद्यार्थी विभागातून येथील कैलास नामदेव कुंभार यांच्या कलाकृतीची निवड झाली आहे. कुंभार यांनी स्टोनपासून तयार केलेल्या ‘मदर आणि चाइल्ड’ या कलाकृतीला अव्वल स्थान मिळाले. त्यांना कोल्हापूरच्या कलामंदिर महाविद्यालयातील शिक्षक तसेच त्यांचे बंधू पवन कुंभार यांचे मार्गदर्शन मिळाले.
चौकट
या प्रदर्शनामध्ये सर्वसाधारणपणे दिल्ली, आंध्र प्रदेश, तामिळनाडूचे कलाकार सहभाग नोंदवतात. मात्र, यंदा ऑनलाईनमुळे देशातील कानाकोपऱ्यातून ३५०० कलाकार सहभागी झाले होते. हे प्रदर्शन दि. २५ एप्रिलपर्यंत रसिकांना बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येणार आहे.