विटा उपजिल्हा न्यायालयाचे ९ डिसेंबरला उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:49+5:302020-12-05T05:05:49+5:30
विटा : विटा येथे खानापूर, कडेगाव, आटपाडी व पलूस या चार तालुक्यांसाठी नव्याने सुरू होणाऱ्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ...

विटा उपजिल्हा न्यायालयाचे ९ डिसेंबरला उद्घाटन
विटा : विटा येथे खानापूर, कडेगाव, आटपाडी व पलूस या चार तालुक्यांसाठी नव्याने सुरू होणाऱ्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (उपजिल्हा) न्यायालयाचे उद्घाटन बुधवार, दि. ९ डिसेंबरला होत आहे.
या उपजिल्हा न्यायालयाचे उद्घाटन मुंबईतून उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्याहस्ते ऑनलाईन होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्घाटन कार्यक्रमाला मोजक्याच दोनशे लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
विटा येथे खानापूर, कडेगाव, आटपाडी व पलूस या चार तालुक्यांसाठी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या चार तालुक्यांतील पक्षकारांचा सांगलीला जाण्याचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे पक्षकारांची चांगली सोय झाली असून पक्षकारांच्या वेळेची व पैशाचीही बचत होणार आहे.
बुधवार, दि. ९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्याहस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा व सत्रन्यायाधीश न्या. विजय पाटील यांनी विटा न्यायालयास गुरूवारी भेट देऊन उद्घाटनाच्या नियोजनाचा आढावा घेतला. सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रम पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी विटा न्यायालयाच्या न्या. श्रीमती डी. एस. चोथे, न्या. जी. एस. हंगे, न्या. डी. एम. हिंग्लजकर, विटा बार असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती अॅड. एस. बी. पाटील, उपाध्यक्ष अॅड. एस. जी. घोरपडे, सेक्रेटरी अॅड. वैभव माने, सहसेक्रेटरी अॅड. पी. एस. बागल, अॅड. बी. एच. कदम, अॅड. महेश शानबाग, अॅड. शौर्या पवार, अॅड. यु. व्ही. यादव, अॅड. सुरेश पवार, अॅड. ए. आय. जाधव, अॅड. संजय देसाई यांच्यासह वकील उपस्थित होते.
फोटो - ०३१२२०२०-विटा-विटा कोर्ट इमारत. हा फोटो वापरणे.
बातमी मेन करावी, ही विनंती.