विटा नगरपालिका सभापती निवडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:13+5:302021-01-13T05:10:13+5:30

बांधकाम समितीच्या सभापतीपदी अरुण गायकवाड, शिक्षण सभापतीपदी संजय तारळेकर, पाणीपुरवठा सभापतीपदी मालती कांबळे, महिला बालकल्याण सभापतीपदी प्रतिभा चोथे व ...

Vita Municipal Chairman elected unopposed | विटा नगरपालिका सभापती निवडी बिनविरोध

विटा नगरपालिका सभापती निवडी बिनविरोध

बांधकाम समितीच्या सभापतीपदी अरुण गायकवाड, शिक्षण सभापतीपदी संजय तारळेकर, पाणीपुरवठा सभापतीपदी मालती कांबळे, महिला बालकल्याण सभापतीपदी प्रतिभा चोथे व उपसभापती सानिका दिवटे यांना संधी मिळाली आहे. स्थायीच्या सदस्यपदी वैभव पाटील, किरण तारळेकर व सारिका सपकाळ यांची वर्णी लागली आहे. नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती व स्थायी समितीच्या सदस्य निवडीची प्रक्रिया मंगळवारी पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत पार पडली. सकाळच्या सत्रात सर्व विषय समितींच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम वेळ संपल्यानंतर प्रांताधिकारी भोर यांनी अरुण गायकवाड, संजय तारळेकर, दहावीर शितोळे, मालती कांबळे, प्रतिभा चोथे व सानिका दिवटे या नूतन सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर प्रांताधिकारी भोर, माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. या सभेस विविध विषयांचे मावळते सभापती, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

फोटो - १२०१२०२१-विटा-नगरपालिका : विटा नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी प्रतिभा चोथे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्यासह नूतन सभापती उपस्थित होते.

Web Title: Vita Municipal Chairman elected unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.