विश्वेश्वरैया यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:28 IST2021-09-18T04:28:07+5:302021-09-18T04:28:07+5:30
फोटो- इस्लामपूर येथे जायंट्स सहेलीतर्फे सुनीता सपकाळ यांच्या हस्ते गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माधुरी फल्ले, संगीता ...

विश्वेश्वरैया यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली
फोटो- इस्लामपूर येथे जायंट्स सहेलीतर्फे सुनीता सपकाळ यांच्या हस्ते गणेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माधुरी फल्ले, संगीता शहा, कविता शहा, रचना शिंदे, श्रद्धा कुलकर्णी, उषा पंडित-मोरे उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर: भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया हे महान अभियंत्यांपैकी एक होते. त्यांनी आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रूप दिले, असे गौरवोद्गार जायंट्स सहेलीच्या अध्यक्षा व बांधकाम सभापती सुनीता सपकाळ यांनी काढले.
जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेलीकडून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे स्थापत्य शास्त्रातील पदवीधर अभियंता गणेश पाटील यांचा सपकाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सपकाळ यांनी गणेश पाटील यांच्या कार्याचे कौतुक करून क्रेडाईसारख्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या.
माजी अध्यक्षा कविता शहा यांनी स्वागत केले. संगीता शहा यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या अभियंता म्हणून गणेश पाटील यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. जायंट्ससारख्या सामाजिक संस्थेशी गेली अनेक वर्षे निगडित राहून शहरातील विविध स्थायी विकास प्रकल्प उभारण्यात त्यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी राकेश कोठारी, कार्यवाह रचना शिंदे, श्रद्धा कुलकर्णी, चारुशीला फल्ले, राजश्री कळसकर, माधुरी फल्ले उपस्थित होत्या. उषा पंडित-मोरे यांनी आभार मानले.