करगणी आरोग्य केंद्रास विश्वजित कदम यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:25 IST2021-04-17T04:25:40+5:302021-04-17T04:25:40+5:30

करगणी : आटपाडी तालुक्यातील करगणी आरोग्य केंद्रास राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भेट देत सुरू असणाऱ्या कोविड प्रतिबंधित लसीकरण ...

Visit of Vishwajit Kadam to Kargani Health Center | करगणी आरोग्य केंद्रास विश्वजित कदम यांची भेट

करगणी आरोग्य केंद्रास विश्वजित कदम यांची भेट

करगणी

: आटपाडी तालुक्यातील करगणी आरोग्य केंद्रास राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी भेट देत सुरू असणाऱ्या कोविड प्रतिबंधित लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी लसीकरणाला गती देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या.

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आटपाडी तालुक्यातील नेलकरजी आरोग्य उपकेंद्र व करगणीतील आरोग्य केंद्राना भेटी दिल्या. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयदीप भोसले, राहुल गायकवाड, सरपंच बाबासाहेब भोसले, शरद भोसले, जालिंदर भोसले, शरद ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ विश्वजित कदम यांनी नेलकरंजी येथे काँग्रेसचे जेष्ठ नेते मोहन भोसले यांच्या निवासस्थानी भेट देत युवा नेते जयदीप भोसले व सहकारी यांच्याशी चर्चा केली.

यानंतर करगणीतील आरोग्य केंद्रात सुरू असणाऱ्या लसीकरणाचा राज्यमंत्री कदम यांनी आढावा घेतला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार, डॉ. प्रशांत चवरे, डॉ. अजित गावडे उपस्थित होते.

Web Title: Visit of Vishwajit Kadam to Kargani Health Center