डॉक्टरांच्या कर्तृत्वाला विश्वजित कदम यांचा सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:27 IST2021-04-22T04:27:18+5:302021-04-22T04:27:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय सेवकांचे कार्य कौतुकास्पद आहे. ...

Vishwajit Kadam salutes the work of doctors | डॉक्टरांच्या कर्तृत्वाला विश्वजित कदम यांचा सलाम

डॉक्टरांच्या कर्तृत्वाला विश्वजित कदम यांचा सलाम

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय सेवकांचे कार्य कौतुकास्पद आहे. ऐन उन्हाळ्यात पीपीई किट घालून रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान पेलणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व वैद्यकीय सेवकांना सलाम, अशा शब्दात सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी कौतुक केले.

पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये विश्वजित कदम यांनी पीपीई किट घालून कोविड कक्षाची पाहणी केली. यावेळी डॉक्टर आणि नर्स यांना पीपीई किट घालून काम करणे किती आव्हानात्मक असते, याचा अनुभव घेतला. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.

कोविड कक्षात ४० ते ४५ मिनिटे थांबलेल्या कदम यांचे शरीर घामाच्या धारांनी भिजून गेले होते.

कदम म्हणाले की, कोरोना रुग्णांवर उपचारात स्वत:ला झोकून दिलेल्या डॉक्टरांना उपचार करताना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी पीपीई किट घालणे अनिवार्य आहे; मात्र पीपीई किट घालून काम करताना होणारा त्रास सहन करीत ते ७ ते ८ तास काम करीत आहेेेत. किट घातल्यानंतर जेवण व पाणी घेता येत नाही. डोक्यापासून पायापर्यंत डॉक्टर घामाने भिजून जातात. तरीसुद्धा पूर्ण निष्ठेने कर्तव्य बजावत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांनीही प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

Web Title: Vishwajit Kadam salutes the work of doctors