इस्लामपुरातील विशालनगरच्या रस्त्याची दुरुस्ती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:09 IST2021-01-13T05:09:42+5:302021-01-13T05:09:42+5:30

इस्लामपूर : येथील विशालनगर परिसरातील रस्त्याची बातमी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच सत्ताधारी विकास आघाडीचे गटनेते विक्रम पाटील यांनी रस्त्याची पाहणी ...

Vishalnagar road in Islampur will be repaired | इस्लामपुरातील विशालनगरच्या रस्त्याची दुरुस्ती होणार

इस्लामपुरातील विशालनगरच्या रस्त्याची दुरुस्ती होणार

इस्लामपूर : येथील विशालनगर परिसरातील रस्त्याची बातमी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच सत्ताधारी विकास आघाडीचे गटनेते विक्रम पाटील यांनी रस्त्याची पाहणी करून प्रशासनाला तत्काळ रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने खराब रस्त्याची दखल घेतल्यामुळे लवकरच रस्त्याचे काम सुरू होणार आहे.

राष्ट्रवादीचे सामाजिक कार्यकर्ते अंगराज पाटील यांनी प्रभागातील रस्ते करण्यासाठी अनेक वेळा पालिकेकडे प्रस्ताव पाठविले होते. विशालनगर ते शिराळा नाकापर्यंत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या परिसरात राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्ताधारी विकास आघाडीने या रस्त्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केल्याची चर्चा होती. यावर ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर पालिकेतील सत्ताधारी विकास आघाडीचे पक्षप्रतोद पाटील यांनी रस्त्याच्या मोजमाप करण्याचा प्रारंभ केला; परंतु रस्ता केव्हा होणार, हा प्रश्न अनुत्तरित असला तरी दोन्ही गटांच्या राजकीय श्रेयवादात अडकतो की काय, यावर चर्चा सुरू आहे.

Web Title: Vishalnagar road in Islampur will be repaired