विशाल पाटील यांची आज संवाद बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:25+5:302021-09-02T04:56:25+5:30
सांगली : काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील झाले आहेत. त्यांना नवे पद मिळाल्यानंतर प्रथमच ते बुधवारी सांगलीत येत असून ...

विशाल पाटील यांची आज संवाद बैठक
सांगली : काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील झाले आहेत. त्यांना नवे पद मिळाल्यानंतर प्रथमच ते बुधवारी सांगलीत येत असून नाराज असलेल्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.
काँग्रेस भवनात बुधवारी दुपारी चार वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराज गटाची प्रतिक्रिया दिसून आली. त्यावर विशाल पाटील प्रथमच सांगलीत येत असून या विषयावर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. कार्यकर्त्यांची ते समजूत काढण्याची शक्यता आहे.
बुधवारी सर्वप्रथम ते वसंतदादा स्फूर्तीस्थळास भेट देणार आहेत. अभिवादन करून नंतर काँग्रेस भवनात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.