विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:22 IST2021-01-15T04:22:03+5:302021-01-15T04:22:03+5:30

सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांचा सत्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत झाला. यावेळी विजय बाविस्कर, संजय भोकरे, ...

Visava Mandal President Sanjay Chavan felicitated | विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांचा सत्कार

विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांचा सत्कार

सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण यांचा सत्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत झाला. यावेळी विजय बाविस्कर, संजय भोकरे, किरण जोशी आदी उपस्थित होते.

सांगली : गावभागातील विसावा मंडळाचे अध्यक्ष संजय चव्हाण यांचा सत्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात झाला. चव्हाण यांनी कृष्णा नदी व घाट परिसरात नियमित स्वच्छता अभियान राबविले आहे. सलग ३६ वर्षे रक्तदान शिबिरे, महापुरात बचाव कार्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कोरोना काळात मदतकार्य, पोहण्याचे प्रशिक्षण वर्ग असे अनेक सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. याबद्दल त्यांचा सत्कार झाला.

यावेळी लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, किरण जोशी आदी उपस्थित होते.

---------

Web Title: Visava Mandal President Sanjay Chavan felicitated