शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात ‘ठरलंय’चं वारं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:11 IST

‘आम्ही ठरवलंय!’, ‘आमचं ठरलंय!’, ‘आमचं फिक्स आहे!’, ‘आमचं जनतेनं ठरवलंय!’ या चार घोषवाक्यांची शिराळा विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. चार प्रमुख नेत्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात फलक लावून,

ठळक मुद्देविधानसभेची चर्चा : नाईक-देशमुखांसह महाडिक गटाकडूनही हवा

विकास शहा ।शिराळा : ‘आम्ही ठरवलंय!’, ‘आमचं ठरलंय!’, ‘आमचं फिक्स आहे!’, ‘आमचं जनतेनं ठरवलंय!’ या चार घोषवाक्यांची शिराळा विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. चार प्रमुख नेत्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात फलक लावून, तसेच सोशल मीडियावरून जणू प्रचारच सुरू केला आहे. या निवडणूक प्रचारामुळे तीन महिने अगोदरच निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे.

शिराळा मतदारसंघ कायम चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचे फिक्स आहे!’, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं जनतेनं ठरवलंय!’, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आमचं ठरलंय!’, तर महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी ‘आम्ही ठरवलंय!’ अशी घोषवाक्ये घेऊन रान उठवले आहे.

लोकसभा निवडणुकीपासून या चार नेत्यांनी लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात या चारही नेत्यांनी गाठीभेटींचा धडाका लावला आहे. शिराळा तालुक्यात नाईक-नाईक-देशमुख घराण्यात विधानसभा लढवली जाते, हे आतापर्यंतचे चित्र आहे. आजवर मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख आपापल्या सोयीप्रमाणे एकमेकांशी लढले. कोणतेही दोन गट एकत्र आले की, तिसऱ्याचा पराभव, हे आजवरचे सूत्र राहिले आहे. मात्र लोकसभेला एकत्र आलेले नेतेच आता विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढतील, अशी परिस्थिती आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली, तर शिराळा कोणाच्या वाटणीला, सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक यांची भूमिका काय असेल, असे प्रश्न आहेत.

भाजपने आपणाला तिकीट द्यावे, अशी सम्राट महाडिक यांची मागणी आहे. अन्यथा नारायण राणे यांच्या ‘स्वाभिमान’चा पर्याय आहेच, तसे राणे कुटुंबीयांनी शिराळा येथे बोलून दाखवले आहे.लोकसभेला धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अभिजित पाटील व सम्राट महाडिक शिवाजीराव नाईक यांच्यासोबत प्रचारात सहभागी झाले होते. राजू शेट्टींच्या प्रचारासाठी मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी पायाला भिंगरी बांधून लोकसंपर्कावर भर दिला. विधानसभेच्या निमित्ताने हे सर्व नेते एकमेकांपुढे उभे ठाकल्याचे दिसल्यास नवल नाही.तिकीट कोणाला : भाजपपुढे प्रश्नभाजपसमोर तिकीट कोणाला द्यायचे, असा प्रश्न आहे. कारण ज्याला तिकीट मिळणार नाही, त्याची बंडखोरी होणार, हे निश्चित आहे. शिवसेनेचे नेते चिकुर्डे येथील अभिजित पाटील व शिराळ्याचे अ‍ॅड. भगतसिंग नाईक यांनीही विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे शिराळा येथील आदित्य ठाकरे यांच्या सभेत जाहीर केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली