राजारामबापूंच्या पुतळ्यास विराज नाईक यांचे अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:19+5:302021-06-16T04:35:19+5:30

राजारामनगर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास विराज नाईक यांनी अभिवादन केले. यावेळी विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, विजयराव नलवडे, राहुल ...

Viraj Naik greets the statue of Rajarambapu | राजारामबापूंच्या पुतळ्यास विराज नाईक यांचे अभिवादन

राजारामबापूंच्या पुतळ्यास विराज नाईक यांचे अभिवादन

राजारामनगर येथे राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास विराज नाईक यांनी अभिवादन केले. यावेळी विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, विजयराव नलवडे, राहुल पवार, एम. जी. पाटील, शैलेश पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुरोगामी आणि लोकहितवादी विचारांचा पक्ष आहे. पक्षासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ताकद देत जिल्ह्यात युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत संघटन करू, असा विश्वास युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी व्यक्त केला. राजारामबापू पाटील हे कुशल संघटक होते. त्यांनी जिल्ह्यात व राज्यात पक्ष संघटनेत प्रभावी काम केले आहे. त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर असेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

नाईक यांनी कारखाना कार्यस्थळावरील राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, शिराळा तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, शिराळा युवक तालुकाध्यक्ष राहुल पवार उपस्थित होते.

शैलेश पाटील यांनीही विराज नाईक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वृध्द कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष एम. जी. पाटील, विश्वनाथ पाटसुते, भानुदास येसुगडे, समीर पाटील उपस्थित होते.

Web Title: Viraj Naik greets the statue of Rajarambapu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.