विराज नाईक यांची युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:18 IST2021-06-11T04:18:54+5:302021-06-11T04:18:54+5:30

फोटो ओळ - मुंबई येथे युवानेते विराज नाईक यांना निवडीचे पत्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते ...

Viraj Naik elected as District President of Youth NCP | विराज नाईक यांची युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

विराज नाईक यांची युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

फोटो ओळ - मुंबई येथे युवानेते विराज नाईक यांना

निवडीचे पत्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ग्रामीण) जिल्हाध्यक्षपदी विराज मानसिंगराव नाईक यांची निवड झाली.

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात त्यांना निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, बाबासाहेब मुळीक, जिल्हा परिषदेचे गट नेते शरद लाड, युवकचे माजी अध्यक्ष भरत देशमुख आदी उपस्थित होते.

Web Title: Viraj Naik elected as District President of Youth NCP