शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP: जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम शिराळा तालुक्याच्या पथ्थ्यावर; सभापतिपदाच्या संधीत कोण मारणार बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:01 IST

जिल्हा परिषदमध्ये पहिल्यापासून शिराळा तालुक्याचे वर्चस्व

विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठी मुसंडी मारून पंचायत समितीवर झेंडा फडकवला. जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी आघाडी ३ तर भाजप महायुती १ उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील विराज नाईक की राजेश्वरी नाईक यांना सभापतीपद मिळण्याची खात्री झाली आहे. जिल्हा परिषद गटासाठी विराज नाईक हे सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आले आहेत.यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी केली होती. यामुळे या निवडणुकीत मोठे यश मिळाले होते. तालुक्याला आतापर्यंत जिल्हा परिषदमध्ये माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांना अध्यक्ष व सभापतीपद, आमदार सत्यजित देशमुख यांना उपाध्यक्ष व सभापतीपद तसेच लोकनेते माजी विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख, दिवंगत नेते उदयसिंगराव नाईक, वैशाली नाईक यांना सभापतीपद मिळाले होते.जिल्हा परिषदमध्ये पहिल्यापासून शिराळा तालुक्याचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश्वरी नाईक किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विराज नाईक यांना सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. यादृष्टीने राजकीय समीकरणे करण्यात येत आहेत.मांगले गटात विराज नाईक सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत तर वाकुर्डे बुद्रुक गटात राजेश्वरी नाईक यांनी मोठा विजय मिळवला आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीने आपली सत्ता टिकवून ठेवली आहे. पंचायत समितीमध्ये माजी आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी ६ जागांवर विजय मिळवला आहे. शिराळा पंचायत समिती सभापती सम्राटसिंह नाईक, शिराळा नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक तसेच आता जिल्हा परिषद सभापतिपदी कोणत्या नाईक यांची वर्णी लागणार याचीच तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jayant Patil's strategy favors Shirala; who will win the chairperson race?

Web Summary : Jayant Patil's strategy secured NCP's victory in Shirala. Viraj Naik, with a significant vote lead, and Rajeshwari Naik are potential candidates for the chairperson position in the Zilla Parishad. Alliances and political equations are being closely watched.