शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

सांगलीचे विनायक साळुंखे करणार आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 4:36 PM

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील विनायक साळुंखे हे अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत भारताचे नेतृत्व करणार आहेत. या निमित्ताने विश्व स्तरावर ग्रामीण महाराष्ट्राची मोहर उमटणार आहे.

ठळक मुद्देसांगलीचे विनायक साळुंखे करणार आंतरराष्ट्रीय युवा परिषदेत भारताचे नेतृत्वग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करणार : विनायक साळुंखे

नवी दिल्ली/सांगली  : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील विनायक साळुंखे हे अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत भारताचे नेतृत्व करणार आहेत. या निमित्ताने विश्व स्तरावर ग्रामीण महाराष्ट्राची मोहर उमटणार आहे.अमेरिकेतील मिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे २४ जुलै ते २ ऑगस्ट २०१८ या कालावधी दरम्यान 'यंग लिडर्स ऍक्सेस प्रोग्राम' साठी जगातून ५० युवकांची निवड झाली असून भारतातून विनायक साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.तीन फेऱ्यानंतर झाली अंतिम निवड आंतरराष्ट्रीय परिषदेतील निवडीसाठी तीन फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. यावर्षी जानेवारी महिन्यात निबंध स्पर्धेची पहिली फेरी पार पडली. ऐच्छिक विषयांवरील या निबंध स्पर्धेत विनायक यांनी ग्रामीण भागातील बेरोजगारी व त्यावरील उपाय या विषयीचे विवेचन केले होते. यानंतर मार्च महिन्यात व्हिडीओ मुलाखत आणि एप्रिल महिन्यात फिल्ड असेसमेंट सर्वे अशा फेरी होऊन  सांळुखे यांची अंतिम निवड करण्यात आली.ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम करणार : विनायक साळुंखेया निवडीनंतर महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना विनायक साळुंखे म्हणाले, माझ्या सारख्या ग्रामीण भागातील तरुणाची आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेसाठी निवड झाली याचा खूप आनंद आहे. या परिषदेत सहभागी होऊन माझ्या भागातील विषय मला मांडता येतील व जगाच्या विविध भागातून आलेल्या प्रतिनिधींचे विचारही मला ऐकता व समजता येतील. या परिषदेतून ग्रामीण भागातील बेरोजगारी निर्मूलनासाठी तयार करण्यात येणा-या कार्यक्रमाची अंमलबाजवणी करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करणार असल्याचा मनोदयही साळुंखे यांनी व्यक्त केला.          मिरजवाडी या छोटयाशा खेड्यातील विनायक साळुंखे यांनी पर्यावरणशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षांपासून नेहरू युवा केंद्राशी ते जुडले असून ग्रामीण तरुणांसोबत त्यांच्या  समस्यांवर काम करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची 'मुख्यमंत्री  फेलोशिप' साठी निवड झाली होती.अनेक सामाजिक संस्थासोबत ते सामाजिक कार्यात आपले योगदान देत आहेत. 'युवक बिरादरी, भारत' या संस्थेच्या २०१७ च्या 'युवा भूषण' पुरस्काराचे ते विजेते आहेत.   आंतरराष्ट्रीय युवा परिषदमिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड  ही संस्था समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या जगभरातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा नेतृत्व विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते.

इथे अमेरिकेतील तसेच जगभरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या तरुणांना मार्गदर्शन करीत असतात, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांच्या विचार आणि कल्पनांच्या देवाण घेवाणीतून प्रत्येकाला आपल्या समाजात असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आराखडा तयारही करायचा असतो.

ग्रामीण तरुणांच्या समोरील बेरोजगारी या समस्येवर विनायक या परिषदेत चर्चा करणार आहेत. पहिल्यांदाच ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रामीण तरुणांचे प्रतिनिधित्व करण्यास निघालेल्या विनायक साळुंखे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. 

टॅग्स :Sangliसांगली