शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली पोलिसांवर बनताहेत विनोद, अनिकेत कोथळे खूनप्रकरणी कल्पकतेने विनोदी घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:25 IST

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी क्रूरतेची परिसिमा गाठलेल्या सांगली पोलिसांच्या दहशतीवर अनेक विनोद सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांमधील गुन्हेगारी वृत्तीला अत्यंत कल्पकतेने विनोदी घाव घालण्याचे काम नागरिकांनी सुरू केले आहे. सोशल मिडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या वीस विनोदांपैकी एक विनोद सांगली पोलिसांवर असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या वीस विनोदांपैकी एक विनोद सांगली पोलिसांवर सोशल मिडियावरच्या विनोदांमुळे संपूर्ण पोलिस दलाची बदनामी होत असल्याची खंत

सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी क्रूरतेची परिसिमा गाठलेल्या सांगली पोलिसांच्या दहशतीवर अनेक विनोद सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांमधील गुन्हेगारी वृत्तीला अत्यंत कल्पकतेने विनोदी घाव घालण्याचे काम नागरिकांनी सुरू केले आहे.सोशल मिडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या वीस विनोदांपैकी एक विनोद अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सांगली पोलिसांवर असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय , स्थानिक घडामोडींनाही सांगली पोलिसांशी यानिमित्ताने जोडण्यात आले आहे.

विजय माल्याची भारतात परतून पोलिसांना शरण जाण्याची इच्छा आहे, पण त्याची अट एकच आहे की, मला सांगली पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. दाऊद इब्राहिमनेही अशाच प्रकारची अट भारताकडे केल्याचा विनोद व्हायरल झाला आहे.कोथळे खूनप्रकणापूर्वीही याच पोलिस ठाण्यात कामटे व अन्य काही पोलिसांच्या छळाला अनेक नागरिकांना सामोरे जावे लागले होते. मानसिक व आर्थिक पिळवणुकीच्या काही कहाण्या समोर येतात, तर काही दडपल्या जातात. त्यामुळे कोथळे प्रकरणानंतर अशा लोकांनी सोशल मिडियाचा आधार घेत पोलिसांच्या क्रूरतेवर व छळवणुकीवर बोट ठेवले.

 

टीकेपेक्षाही हे विनोद आता पोलिसांना लागत आहेत. काही पोलिसांनी या विनोदांमुळे संपूर्ण पोलिस दलाची बदनामी होत असल्याची खंतही व्यक्त केली आहे. सगळेच पोलिस असे क्रूर नसतात असा सूर उमटत असला तरी कोथळे प्रकरणानंतर लोकांचा राग आंदोलनाबरोबरच सोशल मिडियावरील विनोदांमधूनही स्पष्ट होऊ लागला आहे.

यातील विनोद असे...मल्या : मी सरेंडर करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे.पोलिस अधिकारी : काय?मल्या : मला कोणाच्याही ताब्यात द्या, पण सांगली पोलिसांच्या नको! 

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणSangliसांगली