सरकारी शाळांनी घेतला सोशल मिडियाचा आधार

By admin | Published: June 1, 2014 12:06 AM2014-06-01T00:06:16+5:302014-06-01T00:23:12+5:30

सोशल मिडीयाचा वापर करुन सरकारी शाळेतच आपल्या पाल्यांना आणण्यासाठी आकर्षित करण्यात येत आहे.

Social media support by government schools | सरकारी शाळांनी घेतला सोशल मिडियाचा आधार

सरकारी शाळांनी घेतला सोशल मिडियाचा आधार

Next

मालेगाव: राजकारणासह सर्वच क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणार्‍या सोशल मिडीयाचा आता सर्वच क्षेत्रात उपयोग होत आहे. फेसबुक, व्हास्टअँप सारख्या शोसल मिडीयाचा वापर करुन सरकारी शाळेतच आपल्या पाल्यांना आणण्यासाठी आकर्षित करण्यात येत आहे. आता सगळीकडे कॉन्व्हेंट संस्कृती उदयास येत आह व त्या चकाचक दुनियेची सगळयांनाच भुरळ पडत चाचली आहे. त्यामुळे सरकारी शाळा विद्याथ्यरांच्या अभावी मागे पडत चालल्या आहे. चकाचक इमारती, पुरेशा भौतिक सुविधा यामुळे आपला पाल्य कॉन्व्हेंटमध्ये शिकला पाहिजे असा आग्रह धरला जातो. या आव्हानाला सर्मथपणे तोंड देऊन विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी फेसबुक, व्हॉटसअँपसारख्या सोशल मिडीयाचा आधार घेत सरकारी शाळांनी आपली गुणवत्ता पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कंबर कसलेली दिसून येत आहे. सरकारी शाळांमध्येही आता सुसज्ज भौतीक सुविधांसह गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असल्याचा प्रचार करण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळया प्रकारच्या आकर्षक इमेज तयार करुन त्यावर घोषवाक्ये लिहिली जात आहेत. अब की बारी, शाळा सरकारी, आता डोळयाचं पारण फिटलं, सरकारी शाळेत चांगला शिक्षण मिळालं, माझे बाबा सरकारी शाळेत शिकूनच मोठे झाल, मी पण सरकारी शाळेतच शिकणार, खासगी शाळेत पैसे देऊन शिक्षण घेण्यापेक्षा सरकारी शाळेत मोफत शिक्षण घ्या, असे भावनिक आवाहन फेसबुक व व्हॉटसअँप सारख्या सोशल साईटवर करण्यात येत आहे.

Web Title: Social media support by government schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.