भाळवणीत तीन चंदन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:31+5:302021-09-04T04:32:31+5:30

विटा : खानापूर तालुक्यातील पंचलिंगनगर (भाळवणी) येथे चंदन चोरण्यासाठी आलेल्या शेरे-शेणोली स्टेशन (ता. कऱ्हाड) येथील पाचपैकी तिघांना पकडण्यात ग्रामस्थांना ...

The villagers caught three sandalwood thieves in Bhalwani | भाळवणीत तीन चंदन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले

भाळवणीत तीन चंदन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले

विटा : खानापूर तालुक्यातील पंचलिंगनगर (भाळवणी) येथे चंदन चोरण्यासाठी आलेल्या शेरे-शेणोली स्टेशन (ता. कऱ्हाड) येथील पाचपैकी तिघांना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र त्यातील दोघे सात हजाराचे चंदन घेऊन अंधारात पसार झाले.

विशाल मनोहर मदने (वय २०), रोहन रघुनाथ मंडले (१८) व किरण मनोहर मदने (१८) यांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मयूर भिवाजी जाधव व दत्ता धनाजी मदने (दोघेही रा. शेरे शेणोली स्टेशन) अशी फरारींची नावे आहेत.

पंचलिंगनगर (भाळवणी) येथील शेतकरी रवींद्र रामचंद्र नलवडे यांच्या शेतातील बांधावर चंदनाची झाडे होती. दि. १ सप्टेंबररोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पाच चंदन चोरटे दुचाकीवरून (क्र. एमएच ०९ बीएल ८११२) व (क्र. एमएच ५० पी-७१२४) कुऱ्हाड व करवत घेऊन नलवडे यांच्या शेतात आले होते. नलवडे यांनी गावातील अन्य तरुणांच्या मदतीने या चोरट्यांना पकडले. दोघे संशयित सात हजाराचे चंदन घेऊन फरार झाले. तीन संशयितांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: The villagers caught three sandalwood thieves in Bhalwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.