ग्रामदक्षता समित्यांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्याचे प्रयत्न करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:28 IST2021-04-23T04:28:43+5:302021-04-23T04:28:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गावपातळीवर ग्रामदक्षता समित्यांनी कडक भूमिका घेतल्यास कोरोनाला वेशीवरच रोखणे शक्य आहे. समित्यांनी ही जबाबदारी ...

Village vigilance committees should try to stop Corona at the gate | ग्रामदक्षता समित्यांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्याचे प्रयत्न करावेत

ग्रामदक्षता समित्यांनी कोरोनाला वेशीवरच रोखण्याचे प्रयत्न करावेत

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गावपातळीवर ग्रामदक्षता समित्यांनी कडक भूमिका घेतल्यास कोरोनाला वेशीवरच रोखणे शक्य आहे. समित्यांनी ही जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले.

कडेगाव तालुक्यातील कडेपूर, नेवरी, हिंगणगाव बु, खेराडे वांगी व मोहित्यांचे वडगाव येथे कोरोना लसीकरण केंद्रांला भेटीवेळी त्या बोलत होत्या. पंचायत समितीच्या सभापती मंगल क्षीरसागर, उपसभापती आशिष घार्गे, जिल्हा परिषद सदस्या ॲड. शांता कनुजे, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. अध्यक्षा कोरे यांनी लसीकरण केंद्रांवर लसीची उपलब्धता, लसीकरणाचा वेग, ग्रामस्थांचा प्रतिसाद आदींची माहिती घेतली. अडचणी जाणून घेतल्या. लसीकरण झालेल्या ग्रामस्थांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या की, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सध्यातरी लसीकरण हा एकमेव उपाय आहे. शंभर टक्के ग्रामस्थांच्या लसीकरणासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. दक्षता समित्यांनी प्रयत्न केल्यास कोरोना गावात येणार नाही. ग्रामस्थांनीही सहकार्य करावे. कोरोनाविषयक निर्देशांचे पालन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत आरोग्यविषयक सुविधा देण्यास जिल्हा परिषद कुठेही कमी पडणार नाही.

Web Title: Village vigilance committees should try to stop Corona at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.