टोणेवाणी ग्रामपंचायत बिनविरोध करून गावाने एकजूट दाखविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST2021-02-24T04:27:55+5:302021-02-24T04:27:55+5:30
शेगाव : टोणेवाडी, ता. जत गावाने एकजूट करून बिनविरोध ग्रामपंचायत केली. त्यामुळे निवडणूक खर्च वाचण्याबरोबरच गावातील लोकांची ...

टोणेवाणी ग्रामपंचायत बिनविरोध करून गावाने एकजूट दाखविली
शेगाव : टोणेवाडी, ता. जत गावाने एकजूट करून बिनविरोध ग्रामपंचायत केली. त्यामुळे निवडणूक खर्च वाचण्याबरोबरच गावातील लोकांची मने एक झाली. गावचा विकास होण्यासाठी शासकीय फंड व इतर माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ. गावात पिण्याचा पाणीप्रश्न कायमचा मिटविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे बोर्डाचे विभागीय संचालक व माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केले.
टोणेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत नूतन सदस्यांचे सत्कार जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. उपसरपंच कमल घोडके यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला आप्पासाहेब टोणे, उत्तम नुलके, नामदेव गायकवाड, विलास घोडके, विष्णू नुलके, रतिलाल नुलके, परमेश्वर टोणे, गोरख टोणे, रमेश घोडके, अमर घोडके, ज्ञानेश्वर घोडके, नितीन टोणे, संजय कांबळे, विठ्ठल घोडके, संपत घोडके, कमल घोडके, वसंत टोणे, वैशाली हिप्पकर, अनिता टोणे, चागुना नुलके आदी उपस्थित होते.