विलासराव शिंदे विलगीकरण केंद्र नागरिकांना वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:36+5:302021-06-10T04:18:36+5:30
विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रातील रुग्णांना प्रतीक पाटील, विशाल शिंदे, वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, अर्जुन माने, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, ...

विलासराव शिंदे विलगीकरण केंद्र नागरिकांना वरदान
विलासराव शिंदे विलगीकरण केंद्रातील रुग्णांना प्रतीक पाटील, विशाल शिंदे, वैभव शिंदे, झुंजारराव पाटील, अर्जुन माने, स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, पुष्पलता माळी यांच्याहस्ते वाफेचे मशीन भेट देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. तरीही संसर्ग वाढतच आहे. अशा स्थितीत शहरातील काेराेनाबाधितांसाठी विलासराव शिंदे विलगीकरण केंद्र वरदान ठरले आहे.
आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, आष्टा शहर विकास आघाडीचे वैभव शिंदे, प्राचार्य विशाल शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा- इस्लामपूर मार्गावरील विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात २० पुरुष व १० महिलांसाठी सोय करण्यात आली आहे. आष्टा नगरपरिषद, ग्रामीण रुग्णालय व आष्टा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या सहकार्यातून हे केंद्र सुरू आहे. तीन परिचारिका अहोरात्र कार्यरत आहेत. सध्या या केंद्रात २० रुग्ण दाखल आहेत. या रुग्णांना विलासराव शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व शिवाजीराव पाटील आप्पा पतसंस्था यांच्या माध्यमातून सकाळचा चहा व नाष्टा तसेच सायंकाळचा चहा देण्यात येत आहे. दररोज राहुल थोटे यांच्याकडून उकडलेली अंडी देण्यात येत आहेत. नगराध्यक्षा स्नेहा माळी, माजी उपनगराध्यक्ष मनीषा जाधव, प्रतिभा पेटारे, जायंटसचे अध्यक्ष समीर गायकवाड, आसावरी सुतार, सचिन मोरे, विशाल शिंदे यांनी जेवण दिले तर डॉ. सोनाली कुरणे यांनी अल्पोपाहार दिला आहे.
चौकट
या विलगीकरण केंद्रात हवेशीर व आल्हाददायक वातावरण असल्याने येथील रुग्ण लवकरच बरे होत आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील ,तहसीलदार दीक्षांत देशपांडे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संतोष निगडी, पोलीस निरीक्षक अजित सिद, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी भेट देऊन कौतुक केले आहे.