विजयभाऊंचा ठिय्या; पालिका अस्वस्थ

By Admin | Updated: August 28, 2015 23:03 IST2015-08-28T23:03:00+5:302015-08-28T23:03:00+5:30

इस्लामपूर पालिका : नगराध्यक्ष खुर्चीचे धनी, तर उपनगराध्यक्षांकडून खुर्चीचा त्याग

Vijaybhau's stance; The child is restless | विजयभाऊंचा ठिय्या; पालिका अस्वस्थ

विजयभाऊंचा ठिय्या; पालिका अस्वस्थ

अशोक पाटील- इस्लामपूर पालिकेतील नगराध्यक्षांच्या दालनात पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना बसण्यासाठी सन्मानाने खुर्ची ठेवण्यात आली आहे. शिवाय नगराध्यक्षांच्या दालनाशेजारीच छोटेसे कार्यालय आहे. परंतु या वर्षभरात पाटील यांनी नगराध्यक्ष दालनाबाहेरच्या लोखंडी बाकड्याचा ताबा घेतला आहे. त्यावर बसूनच पाटील पालिकेचा कारभार हाकत असल्याने, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी खुर्चीचे धनी बनले आहेत, तर उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी निवडीदिवशीचा एक दिवस वगळता खुर्चीचा त्यागच केला आहे.
इस्लामपूर नगरपालिकेतील राजकारण पाहता, सर्व निर्णय विजयभाऊ पाटील यांच्या विचारानेच घेतले जातात. पाटील शहरातील आणि पालिकेच्या राजकारणातील अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. पालिकेत तीन गट कार्यरत आहेत. यामध्ये पाटील यांचा मोठा गट आहे. यामुळेच प्रत्येक निवडणुकीत आमदार जयंत पाटील त्यांच्याशी सल्लामसलत करूनच निर्णय घेतात.
माजी नगराध्यक्ष अशोकदादा पाटील, वाय. एस. जाधव, अ‍ॅड. सुधीर पिसे, भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, सौ. शारदादेवी पाटील यांनी विजयभाऊंना वगळून स्वत:च्या हिमतीवर निर्णय घेतले. त्यामुळे त्यांना काम करताना अनेक अडथळे आले. उर्वरित सर्वच नगराध्यक्षांनी विजयभाऊंच्या ओंजळीनेच पाणी पिले आहे. आता मात्र कहरच झाला आहे. नगराध्यक्ष सूर्यवंशी यांची निवड होऊन वर्ष झाले. मात्र ते केवळ ‘सह्याजीराव’ बनले आहेत. कार्यालयीन वेळेनुसार हजर राहणे, कार्यालयाची वेळ संपल्यानंतर निघून जाणे, हा एककलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. कारभाराबाबतचे सर्व निर्णय बाहेर ठेवलेल्या बाकड्यावरच होत असल्याने, सर्वसामान्यांना नगराध्यक्षांचा चेहराही पाहायला मिळत नाही, ही बाब अत्यंत खेदजनक असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
उपनगराध्यक्ष संजय कोरे नेमके कोणाच्या गटाचे आहेत, याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. ते एन. ए. गु्रपचे असल्याचे मानले जाते. त्यामुळे विजयभाऊ पाटील यांचे समर्थक त्यांच्या कामात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परिणामी त्यांनी निवडीचा दिवस वगळता खुर्चीचाच त्याग केला आहे. ते त्यांचे काम प्रभागात राहूनच करत आहेत. बाकड्यावरील राजकारणामुळेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचे दालन अस्वस्थ झाले आहे, एवढे मात्र नक्की!


बाकड्यावरून कारभार
विजयभाऊ पाटील ज्या बाकड्यावर बसतात, तेथूनच पालिकेचा कारभार हाकला जातो. परंतु ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील मात्र आवारातील झाडाखाली उभे राहून सर्वसामान्यांची कामे करताना दिसतात.

नगराध्यक्षांकडे जाणाऱ्या लोकांना ते आपल्याजवळ थोपवतात, तर पालिकेत येणारे लोक विजयभाऊ पाटील अथवा नगराध्यक्षांकडे न जाता आपल्याकडेच येण्यासाठी बी. ए. पाटील वर्षानुवर्षे पालिका आवारातील झाडाखाली थांबतात.

Web Title: Vijaybhau's stance; The child is restless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.