तेली समाजाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी विजय संकपाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:24 IST2021-02-14T04:24:29+5:302021-02-14T04:24:29+5:30

सांगली : शिर्डी येथे झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी सांगलीचे विजय संकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात ...

Vijay Sankapal as the Youth State President of Teli Samaj | तेली समाजाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी विजय संकपाळ

तेली समाजाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी विजय संकपाळ

सांगली : शिर्डी येथे झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी सांगलीचे विजय संकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आला. तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याहस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. विजय संकपाळ यांनी ग्रामीण जिल्हास्तर, राज्यस्तराव समाजाची चांगल्यापध्दतीने बांधणी केली होती. समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने लढा उभारला होता. या सर्व कार्याची दखल घेऊनच त्यांच्यावर प्रांतिक तेली समाजाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. यावेळी विजय संकपाळ यांनी समाजबांधवांची विविध अडीअडचणींची सोडवणूक व ओबीसीचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार शिवाजीराव चौथे, माजी आमदार शिरीष चौधरी, विक्रांत चांदवडकर, महाराष्ट्र प्रभारी प्रियाताई महिंद्रे, राष्ट्रीय काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, जी. एम. जाधव, विजय रत्नपारखी, विलास काळे, ज्ञानेश्वर दुर्गाडे आदी उपस्थित होते.

Web Title: Vijay Sankapal as the Youth State President of Teli Samaj