गोटखिंडीच्या उपसरपंचपदी विजय पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:19 IST2021-01-10T04:19:52+5:302021-01-10T04:19:52+5:30
ग्रामपंचायतीमध्ये हुतात्मा गटाचे १२ सदस्य, तर राष्ट्रवादी गटाचे पाच सदस्य व लोकनियुक्त सरपंच आहे. हुतात्मा गटाचे १२ सदस्य ...

गोटखिंडीच्या उपसरपंचपदी विजय पाटील यांची निवड
ग्रामपंचायतीमध्ये हुतात्मा गटाचे १२ सदस्य, तर राष्ट्रवादी गटाचे पाच सदस्य व लोकनियुक्त सरपंच आहे. हुतात्मा गटाचे १२ सदस्य असल्याने त्यांच्याच सदस्याची उपसरपंचपदी निवड केली जाते. सविता पाटील यांचा कार्यकाल संपल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या निवडीसाठी शनिवारी बैठक झाली. यात विजय पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच सविता पाटील व मान्यवरांच्या हस्ते विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी पणन मंत्री सदाभाऊ खोत, सागर खोत यांच्याहस्तेही सत्कार करण्यात आला.
यावेळी हुतात्मा दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, एन. के. पाटील, बी. टी. घारे, बी. आर. थोरात, दिनकर बाबर, विनायक पाटील, संदीप पाटील, अशोक पाटील, लालासाहेब लोंढे, नंदकुमार पाटील, विक्रम पाटील, अभिजित घारे, विलास खराडे उपस्थित होते. सुनील गावडे यांनी प्रास्ताविक केले. अॅड. ऐ. जे. कोकोटे यांनी आभार मानले.
फोटो-०९विजय पाटील