विहार निसर्गंध यांना पीएच.डी. पदवी प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:36+5:302021-09-05T04:30:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : येथील आदर्श महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक विहार निसर्गंध यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी ...

विहार निसर्गंध यांना पीएच.डी. पदवी प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : येथील आदर्श महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक विहार निसर्गंध यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी अफ्रो -अमेरिकन साहित्यावरील लँगस्टेन ह्यू या निग्रो लेखकाच्या निवडक नाटकातील वर्णभेद, रंगभेद व जातीभेद या विषयावर प्रबंध सादर केला होता. त्यांना पलूस महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. पी. एम. पाटील़, प्रा. डॉ. माधवी निकम यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील, अध्यक्ष वैभव पाटील, कार्यकारी संचालक पी. टी. पाटील, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कोरे यांनी प्रा. विहार निसर्गंध यांचे अभिनंदन केले. यावेळी आदर्श महाविद्यालयाच्यावतीने सदाशिवराव पाटील, वैभव पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार केला.