शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जैन पाठशाळांसाठी विहार धाम बांधणार, महामंडळाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:08 IST

सांगली : जैन धार्मिक ट्रस्टच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत, संस्कृत, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना सुरू करणार आहे. तसेच ...

सांगली : जैन धार्मिक ट्रस्टच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या जैन पाठशाळांमध्ये प्राकृत, संस्कृत, संगणक शिक्षणासाठी अनुदान योजना सुरू करणार आहे. तसेच जैन साधू-साध्वी यांच्या विहार मार्गामध्ये विहार धाम निर्माण करण्याचा निर्णय जैन आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील यांनी दिली.राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. यावेळी अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, उपसचिव मो. बा. ताशिलदार, जैन महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी, व्यवस्थापकीय संचालक जी. पी. मगदूम, विशेष निमंत्रित संदीप भंडारी, जयेश ओसवाल, नीरव देढीया यांच्यासह उपसचिव विशाखा आढाव व अन्य अधिकारी उपस्थित होते.रावसाहेब पाटील म्हणाले, ललित गांधी यांनी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळातून राबवायच्या विविध योजनांचा आढावा घेतला. व्यापार, उद्योग, शेती कर्ज, महिला बचतगट अर्थसहाय्य, गृह कर्ज, विधवा पेन्शन या योजना एप्रिल २०२५ पासून सुरू करण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी मंत्री भरणे यांच्याकडे केली.यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जैन महामंडळाच्या योजनांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन अतिरिक्त निधी उपलब्ध करण्याची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करू, असे सांगितले. तसेच जैन मंदिर, स्थानक, संघ या नोंदणीकृत संस्थांद्वारे जैन पाठशाळा संचलित केल्या जातात, अशा पाठशाळांमध्ये जैन विद्यार्थी, जैन महिला शिक्षण घेतात, त्यांना केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

प्राकृत भाषेचे, संस्कृत भाषेचे तसेच संगणक शिक्षण देण्यासाठी अनुदान देण्यात येईल. पूर्णपणे पायी विहार (यात्रा) करणाऱ्या जैन साधू-साध्वींना त्यांच्या यात्रा मार्गात सोय नसलेल्या ठिकाणी विहार धाम निर्माण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले आहे.अल्पसंख्याक मंत्रालयाचे प्रधान सचिव रूचेश जयवंशी यांनी महामंडळाच्या गतिशील कामकाजासाठी मंत्रालयाचे संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी दिली. व्यवस्थापकीय संचालक जी. पी. मगदूम यांनी आभार मानले.

टॅग्स :Sangliसांगली