अंकलखाेप परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:27 IST2021-02-05T07:27:42+5:302021-02-05T07:27:42+5:30

अंकलखोप : पलूस तालुक्यातील कृष्णाकाठच्या परिसरात गवा रेड्यांच्या कळपाचा वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री अंकलखोप ...

View of a herd of cows in Ankalkhaep area | अंकलखाेप परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन

अंकलखाेप परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन

अंकलखोप : पलूस तालुक्यातील कृष्णाकाठच्या परिसरात गवा रेड्यांच्या कळपाचा वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री अंकलखोप परिसरातील रस्त्यावर तीन गव्यांचे दर्शन झाले. यावेळी काही तरुणांनी या गव्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच सरपंच अनिल विभुते यांची वैभवनगर परिसरात धाव घेतली. गवे बिथरण्याचा धाेका लक्षात घेऊन त्यांनी पाठलाग करणाऱ्या तरुणांना राेखले.

गेल्या महिन्यात वाळवा, नागठाणे या परिसरातील उसाच्या शेतामध्ये गव्यांचे दर्शन होत होते. महिन्याभरापूर्वी सागरेश्वर अभयारण्य परिसरातही गव्यांचा कळप आढळून आला हाेता. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वैभवनगर परिसरातील रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना तीन गव्यांचे दर्शन झाले. यानंतर अंकलखोप पेट्रोलपंपाच्या परिसरातही गाव्यांचे दर्शन झाले. हे गवे भिलवडी गावाच्या दिशेने गेल्याची चर्चा दिवसभर हाेती. भिलवडी व अंकलखोप परिसरातील कृष्णा नदीकाठच्या उसाच्या शेतामध्ये गव्यांचा कळप असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही तरुण या गव्यांचा माग काढण्याच्या प्रयत्नात हाेते. मात्र, साेमवारी दिवसभरात हे गवे कोणाच्याही दृष्टीस पडले नाहीत. वनविभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून हाेत आहे.

Web Title: View of a herd of cows in Ankalkhaep area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.