शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Video : विहिरीत पडलेल्या नागाला वाचवलं, सर्पमित्रांची जीवघेणी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 17:42 IST

इंगरुळ खडी येथील शंकर पाटील यांच्या 50 फूट पायऱ्या नसलेल्या खोल विहिरीत नाग पडला होता.

शिराळा (जि. सांगली) : नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळ्याचे ग्रामस्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून नागाचे प्राण वाचवतात, असे अनेक प्रसंग घडले आहेत. असाच प्रसंग कापरी-इंगरुळ खडी (ता. शिराळा) येथे आज घडला. पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या नागास शिराळकरांनी जीवदान दिले आहे.

इंगरुळ खडी येथील शंकर पाटील यांच्या 50 फूट पायऱ्या नसलेल्या खोल विहिरीत नाग पडला होता. अमर पाटील यांनी हा नाग पहिला व त्याची माहिती शिराळा येथील शिवछावा स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक प्राध्यापक सुशीलकुमार जयवंतराव गायकवाड यांना दिली. सुशीलकुमार व धीरज हे जीवाची पर्वा न करता दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत उतरूले. तसेच खेळाडू अवधूत पाटोळे, सागर माळी, सौरभ शिंदे तसेच शिवछाया स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी एका दोरखंडाने प्लास्टिक पोते व काठी विहिरीत सोडली.जवळजवळ तीन तास अथक प्रयत्न करून हा नाग पकडून पोत्यामध्ये घालून दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीबाहेर काढला. घटनेची माहिती वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक यांना दिली. त्यानंतर वनपाल सचिन पाटील घटनास्थळी आले. नागास पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. त्याठिकाणी डॉक्टरांनी नागाची तपासणी केली. त्यानंतर या नागास सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. शिराळकरांनी यापूर्वी नांगरट करताना नांगरात अडकून जखमी झालेले, बोअर-विहिरीत अडकलेले, वाहनांच्या धडकेत जखमी झालेले, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले अनेक नाग वाचवले आहेत. इतर कोणत्याही ठिकाणी सर्प पहिला की त्यास मारले जाते. मात्र शिराळा येथे सर्प तसेच नागाचा जीव वाचवला जातो. वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून सापाला वाचवले जाते.

खाऊ घालून सोडलेनाग विहिरीत पडल्याने दोन दिवस उपाशी असावा असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर या सर्व शिराळकरांनी पाहुण्या नागाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर खाऊ घालून सुरक्षितस्थळी सोडले.

पाहा व्हिडीओ - 

 

टॅग्स :snakeसापSocial Mediaसोशल मीडियाSangliसांगली