शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Video - डीजेच्या तालावर थिरकले आमदार विश्वजित कदम; तरुणाईचा आनंद द्विगुणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 14:22 IST

आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी पलूस आणि कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी  गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले यावेळी हणमंतनगर चिंचणी येथील राजमुद्रा मंडळालाही भेट दिली.

प्रताप महाडीक 

कडेगाव - माजी सहकार व कृषी राज्यमंत्री आमदार  डॉ.विश्वजित कदम यांनी चिंचणी तालुका कडेगाव येथे एका गणेशोत्सव  मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या तालावर चक्क ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी गुरुवारी पलूस आणि कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी  गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले यावेळी हणमंतनगर चिंचणी येथील राजमुद्रा मंडळालाही भेट दिली.

मंडळाची गणेश विसर्जन मिरवणुक नुकतीच सुरू झाली होती. यावेळी ढोल ताशांच्या दणदणाट, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, सजवलेल्या ट्रॅक्टर रथावर विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती, गुलालाची उधळण यामुळे वातावरण एकदम मंगलमय झाले होते.अशा जल्लोषपूर्ण वातावरणात संध्याकाळी राजमुद्रा मंडळाची गणपती विसर्जन मिरवणुकीस सुरू झाली. या गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी आमदार डॉ.विश्वजित कदम यांचे आगमन झाले. 

आमदार डॉ. कदम यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. दरम्यान काही वेळाने "भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या गुल आम्ही ठरलोय आज सक्सेसफुल, सक्सेसफुल  ठरलोय आज सक्सेसफुल" हे गाणे वाजू लागले. तरुणाईने ठेका धरला यावेळी  यावेळी कळत-नकळत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी तरुणाईसोबत  ठेका धरला."सक्सेसफुल" चा जोश सर्वत्र पसरला आणि जल्लोष सुरू झाला. समोर प्रेक्षक आणि कार्यकर्त्यांनी शिट्ट्यांची बरसात सुरू केली. यावेळी राजमुद्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आणि तरुणाईचा आनंदही द्विगुणित झाला आणि तरुणाईने गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष झाला.  

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमGaneshotsavगणेशोत्सव