कोरोनाशी लढताना विजय तुमचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:26 IST2021-05-24T04:26:36+5:302021-05-24T04:26:36+5:30

कसबे डिग्रज : कोरोनावर औषध व आहाराने मात करता येते. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून लढा. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाशी लढताना ...

Victory is yours when you fight Corona | कोरोनाशी लढताना विजय तुमचाच

कोरोनाशी लढताना विजय तुमचाच

कसबे डिग्रज : कोरोनावर औषध व आहाराने मात करता येते. स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून लढा. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाशी लढताना विजय तुमचाच आहे. कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्याची गरज आहे, असे व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.

मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज, नांद्रे, समडोळी या गावातील संस्था विलगीकरण कक्ष व कोविड सेंटरमध्ये व्याख्याते वसंत हंकारे यांचे कार्यक्रम झाले. यावेळी योगासन, हास्य व नृत्याचा वापर करत कोरोनाग्रस्तांना तणावमुक्त करण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. या केंद्रांमधील कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्याच्या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, अण्णासाहेब सायमोते, संजय बिले, किरण पाटील, राजगोंडा पाटील आदींनी संयोजन केले.

फोटो ओळ : समडोळी येथील कोविड सेंटरमध्ये हास्य व नृत्यात रंगलेले कोरोना रुग्ण.

Web Title: Victory is yours when you fight Corona