शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

पाण्याच्या खड्ड्याने घेतला चिमुरडीचा बळी

By admin | Updated: April 15, 2015 00:30 IST

सांगलीतील दुर्घटना : महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

सांगली : घराबाहेरील अंगणात नळाच्या पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. येथील त्रिमूर्ती कॉलनीत स्वामी समर्थ मंदिराजवळ मंगळवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. अनघा सागर व्हावळ, असे या चिमुरडीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली होती. कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याने या चिमुरडीचा बळी घेतल्यानंतर महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्रिमूर्ती कॉलनी परिसरात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत असल्याने प्रत्येकाने घराबाहेर खड्डा खोदून नळाचे पाणी घेतले आहे. शिवाय पाण्याचा साठा करण्यासाठी हौदही तयार करून घेतले आहेत. व्हावळ कुटुंबानेही अडीच ते तीन फुटांचा खड्डा खोदून त्याचाच हौद तयार करून घेतला आहे. मंगळवारी पाणी येणार नसल्याने या कुटुंबाने सोमवारी रात्री हा हौद पाण्याने भरून ठेवला होता. अनघा दुपारी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी घरातील लोकांचे तिच्याकडे लक्ष नव्हते. दुपारी दोन वाजता तिची आई तिला खाऊ देण्यासाठी बाहेर आली; परंतु अनघा अंगणात नव्हती. तिचा शोध घेण्यात आला. त्यावेळी ती त्यांच्याच पाण्याच्या हौदात बुडाल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेनंतर व्हावळ कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नाही. सांगली-मिरज-कुपवाड शहरांतील अनेक उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणी येत असल्याने बहुसंख्य कुटुंबांनी घराबाहेर नळाच्या ठिकाणीच खड्डा खोदून पाणी घेण्याचा उपाय शोधला आहे. मंगळवारच्या घटनेने तो उपायच मुळावर आल्याचे स्पष्ट झाले. शिवाय महापालिकेचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे. (प्रतिनिधी) नागरिक सावध उपनगरांमध्ये प्रत्येकाच्या घराबाहेर खड्डे आणि पाण्याचे हौद आहेत, मात्र अनेकांच्या हौदावर झाकण नाही. काहीजणांनी पत्र्याचे झाकण केले आहे. अनघाच्या मृत्यूनंतर अनेकजण सावध झाले आहेत. हौदावर जाड फरशीचे झाकण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती.