शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: खंडेराजुरीत पशुवैद्यक तज्ज्ञाने संपवले जीवन, खासगी सावकारांच्या त्रासामुळे आत्महत्येची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:10 IST

मिरज : खंडेराजुरी (ता. मिरज) येथे शुभम प्रकाश कोष्टी (वय २८) या पशुवैद्यक तज्ज्ञाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या ...

मिरज : खंडेराजुरी (ता. मिरज) येथे शुभम प्रकाश कोष्टी (वय २८) या पशुवैद्यक तज्ज्ञाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शुभम कोष्टी याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार त्याचा भाऊ शैलेश प्रकाश कोष्टी यांनी पोलिस ठाण्यात केली आहे.शुभम कोष्टी याने दि. २८ मार्च रोजी घराच्या मागे शेतात विष प्राशन केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पशुवैद्यकीय काम करणाऱ्या शुभम यांनी गावात जनावरांचा मुक्त गोठा व डेअरी सुरू केली होती. यासाठी त्यांनी खंडेराजुरी व कुकटोळी येथील चार खाजगी सावकारांकडून चार लाख रुपये कर्ज दहा टक्के व्याजाने घेतले होते. या कर्जाची परतफेड केल्यानंतरही आणखी दहा लाख रुपये वसुलीसाठी शुभम यांना दमदाटी सुरू होती. खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून भाऊ शुभम याने आत्महत्या केली व या खाजगी सावकारांना एक पोलिस कर्मचारीही मदत करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भावाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आदिनाथ चौगुले, सम्मेद चौगुले, दीपक रुपनर (सर्व रा. खंडेराजुरी) व बाळासो बंडगर (रा. कुकटोळी, ता. कवठेमहांकाळ) यांच्यावर कारवाईची मागणी शैलेश कोष्टी यांनी पोलिसात केली आहे. या तक्रारीबाबत चौकशी सुरू असल्याचे ग्रामीण पोलिस निरीक्षक अजित सिद यांनी सांगितले. मृत शुभम कोष्टी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगली