शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जयराम कुष्टे यांचे निधन; मिरजेत अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 14:30 IST

जेल फोडण्याच्या घटनेचा अखेरचा शिलेदार हरपला

सांगली : स्वातंत्र्यसंग्रामातील ज्येष्ठ क्रांतिकारी व ब्रिटीश काळात सांगलीचा जेल फोडण्याच्या घटनेतील अखेरचे शिलेदार जयराम विष्णुपंत कुष्टे (वय १0२) यांचे रविवारी सकाळी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.कोकणातल्या राजापूर तालुक्यातील चुना कोळवणमध्ये २४ फेब्रुवारी १९१८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्याचठिकाणी त्यांचे दुसरीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर तिसरीसाठी त्यांना वेंगुर्ला तालुक्यातील कोंबुरले येथे त्यांच्या बहिणीकडे पाठविण्यात आले. तिसरीतून त्यांनी शिक्षणाला राम राम केला. त्यानंतर सोनारकाम शिकण्यासाठी ते कोल्हापूरला आले. त्याठिकाणी त्यांनी प्रज्ञापरिषदेत सहभाग घेतला. कोल्हापुरातच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. कोल्हापुरातच त्यांची व वसंतदादा पाटील यांची ओळख झाली आणि त्यांच्या कार्याने प्रभावीत होऊन ते सांगलीत आले.कुष्टे यांनी स्वातंत्र्यसंग्रामात दिलेले योगदान मोठे आहे. १९४२ च्या काँग्रेस अधिवेशनातील ‘करेंगे या मरेंगे’ या घोषणेला मंत्र मानून सांगलीतील ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी क्रांतिकार्य सुरू केले. त्यातील जयराम कुष्टे हे महत्त्वाचे शिलेदार होते. या क्रांतिकार्यामुळे त्यावेळी काही जणांना अटक झाली होती. त्यात वसंतदादा पाटील, हिंदुराव पाटील, गणपतराव कोळी, जयराम कुष्टे, जिनपाल खोत, सातलींग शेटे, महादेवराव बुटाले, वसंत सावंत, मारुती आगलावे, अण्णासाहेब पत्रावळे, बाबुराव जाधव, विठ्ठल शिंदे, जयराम बेलवलकर, दत्तात्रय पाटील, नामदेवराव कराडकर, कृष्णा पेंडसे, बाबुराव पाचोरे, तात्या सोनीकर यांचा समावेश होता. या स्वातंत्र्यसैनिकांनी २४ जुलै १९४३ रोजी सांगलीचा जेल फोडला होता. यात जयराम कुष्टेही आघाडीवर होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व अन्य सहकाºयांसमवेत त्यांनी या थरारक घटनेत पुढाकार घेतला होता.क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी. डी. (बापू) लाड, हुतात्मा किसन अहिर यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांबरोबर त्यांनी काम केले. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने बक्षिस ठेवले होते. बारा वर्षे ते भूमिगत राहिले होते. त्यावेळी ते अकलूज येथे शंकरराव मोहिते-पाटील यांच्या वाड्यात वास्तव्यास होते.स्वातंत्र्यानंतर ते सांगलीतच स्थायिक झाले. सामान्य माणसाप्रमाणे ते आयुष्य जगले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मिरज-पंढरपूर रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.