शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

विट्यातील ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव साळुंखे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 11:05 IST

गोल्ड व सिल्वर रिफायनरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतातील विविध राज्यात विखुरलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांना एकत्रित करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.

दिलीप मोहिते विटा : सांगली जिल्ह्यातील पारे (ता. खानापूर) गावचे सुपुत्र, केरळ राज्यातील ज्येष्ठ सोने-चांदी गलाई उद्योजक आणि ऑल इंडिया गोल्ड व सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष प्रतापराव (शेठ) महादेव साळुंखे यांचे शनिवारी मध्यरात्री पुणे येथे हृदयविकाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.प्रसिद्ध उद्योजक प्रतापराव साळुंखे (दादा) यांनी सुरुवातीपासून सोने-चांदी गलाई व्यवसायाला नवी दिशा मिळवून दिली. गोल्ड व सिल्वर रिफायनरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतातील विविध राज्यात विखुरलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांना एकत्रित करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. सोने-चांदी गलाई व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध माध्यमातून अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले.सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी विटा येथे शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेची स्थापना करून गरजू कुटुंबीयांना आर्थिक पाठबळ दिले. आज या संस्थेच्या महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक शाखांमधून गरजू लघु उद्योजकांनाही दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे. सार्वजनिक कामात त्यांचा नेहमी सहभाग होता. माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम व ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांचे व्याही होत. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रतापराव साळुंखे यांनी खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पद घेऊन तालुक्यात पक्षाची नवी उभारणी केली.वयाची 83 वर्षे झाली असली तरी त्यांचा सार्वजनिक कामात तितकाच सहभाग होता. तसेच संस्थात्मक कामांवर ही त्यांचे लक्ष होते. सोने-चांदी गलाई व्यवसायिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आजही काम करीत होते.शुक्रवारी दुपारी त्यांनी शिवप्रताप पतसंस्थेत येऊन कामकाज पाहिले व त्यानंतर पुणे येथे नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी भारती हॉस्पिटलला गेले. शनिवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण खानापूर तालुक्यावरच नव्हे तर भारतभर विखुरलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता, मुले सतीश व शेखर, मुली सुनीता कदम, सविता देवकर, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbusinessव्यवसाय