शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांंची यादी लागणार चौकात विटा नगरपरिषदेचा निर्णय : घरपट्टी थकीत असलेल्या ११५ जणांना जप्तीच्या नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:10 IST

विटा : घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या नावांची यादी विटा शहरातील चौका-चौकात झळकणार आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय

ठळक मुद्देविटा : घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या नावांची यादी विटा शहरातील चौका-चौकात झळकणार आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

विटा : घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या नावांची यादी विटा शहरातील चौका-चौकात झळकणार आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने मार्चअखेरपर्यंत कर वसुली युध्दपातळीवर सुरू केली असून, सुमारे ११५ थकीत मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा दिल्या आहेत.

विटा नगरपरिषदेने मार्चअखेर घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे जवळपास १०० टक्के ध्येय निश्चित केले होते. परंतु, शनिवारी ३१ मार्चअखेर वसुलीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. थकबाकीदारांनी पालिका कर्मचाऱ्यांना झुलवत ठेवले. त्यामुळे आता प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांवर वचक बसविण्यासाठी विविध युक्त्या शोधून काढल्या आहेत. दि. १ एप्रिलपासून थकबाकीदारांची नावे डिजिटल फलकाद्वारे चौका-चौकात लावण्यात येणार आहेत.

विटा नगरपालिका प्रशासनाने मार्चअखेर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी गुरुवार, शुक्रवार या सार्वजनिक सुट्टीच्यादिवशीही कार्यालय सुरू ठेवून कर्मचाºयांना वसुलीच्या मोहिमेवर धाडले होते. या दोन दिवसातही चांगला प्रतिसाद मिळाला.कराच्या रकमेवर २ टक्के व्याज...पाणीपट्टी थकबाकीपोटी विटापालिकेने ४५ नळकनेक्शन तोडली असून, ११५ मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. शहरात सध्या १४ हजार ९१५ मालमत्ताधारक असून, त्यांच्याकडून प्रतिवर्षी ५ कोटी २१ लाख ५२ हजार कर आकारला जातो. त्यापैकी आतापर्यंत ३ कोटी २८ लाख ७४ हजार रुपये जमा झाले आहेत. शहरात ९ हजार ५२० नळ कनेक्शन असून, पाणीपट्टी २ कोटी ८९ लाख ६ हजार रुपये होते. त्यापैकी दि. ३० मार्चअखेर १ कोटी ७४ लाख १७ हजार रुपये जमा झाले आहेत. १ एप्रिल २०१८ पासून थकबाकीदारांना कराच्या रकमेवर २ टक्के व्याज आकारण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.