व्यंकाप्पा पत्की यांनी सर्वसामान्यांचे हित जोपासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:49 IST2021-02-28T04:49:00+5:302021-02-28T04:49:00+5:30

फोटो ओळ : आष्टा येथे माजी आ. व्यंकप्पा पत्की यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक वग्यानी, भीमराव ...

Venkappa Patki looked after the interests of the common man | व्यंकाप्पा पत्की यांनी सर्वसामान्यांचे हित जोपासले

व्यंकाप्पा पत्की यांनी सर्वसामान्यांचे हित जोपासले

फोटो ओळ : आष्टा येथे माजी आ. व्यंकप्पा पत्की यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोक वग्यानी, भीमराव सोनवणे, वसंत कांबळे, भुपाल हालुंडे, वसंत कुकडे उपस्थित होते.

अशोक वग्यानी

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : माजी आ. व्यंकाप्पा पत्की यांनी सर्वोदय सहकारी साखर कारखाना उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी जीवनभर सर्वसामान्य माणसाचे हित जोपासले. तत्त्वनिष्ठ व कायदेशीर मार्गाने लढा दिला. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे, असे प्रतिपादन शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक वग्यानी यांनी केले.

आष्टा येथील शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेत व्यंकप्पा पत्की यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भीमराव सोनवणे, अशोक मदने, वसंत कांबळे यांनी प्रतिमा पूजन केले. ॲड. अभिजित वग्यानी, भूपाल हालुडे, वसंत कुकडे, मोहन वग्यानी, धनाजी गायकवाड, अल्ताफ सवार, अरुण चौगुले आदी उपस्थित होते.

Web Title: Venkappa Patki looked after the interests of the common man