बाजार समितीची गाडी तब्बल दोन वर्षे उपनिबंधकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:17+5:302021-03-04T04:51:17+5:30

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे जत, कवठेमहांकाळ व मिरज असे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी ...

The vehicle of the market committee has been with the Deputy Registrar for two years | बाजार समितीची गाडी तब्बल दोन वर्षे उपनिबंधकांकडे

बाजार समितीची गाडी तब्बल दोन वर्षे उपनिबंधकांकडे

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे जत, कवठेमहांकाळ व मिरज असे तीन तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी नसल्याने अडचण झाली आहे. मात्र साहेबांनी गाडी नेल्याने सर्वांचीच गोची झाली आहे. ज्यावेळी आपत्कालीन परिस्थिती होती, त्यावेळी मिरज उपनिबंधकांनी गाडी वापरली. गेली दीड-दोन वर्षे झाली तरी त्यांची गाडीची हौस संपेना झाली आहे. साहेबांचा येथील कार्यकाळ संपत आला असून येथून गेल्यानंतरच गाडी परत करणार का? असा सवाल केला जात आहे. अधिकाराचा गैरवापर करून ते गाडी वापरत असल्याचीही चर्चा आहे. तसे पाहिले तर ते बाजार समितीच्या संचालक मंडळावर शासकीय संचालक म्हणून नियुक्त आहेत. मात्र पदाचा गैरवापर करीत असल्याचे म्हणणे आहे. त्यांना गाडी देताना शासन आदेश होता का? असेल तर तो किती दिवसासाठी होता, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सचिव आणि संचालकांसाठी असलेली गाडी नसल्याने गैरसोय होत असून या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. पदाचा गैरवापर करून उपनिबंधक गाडी वापरत असून याबाबतची, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे.

बाजार समितीकडे दोन चारचाकी गाडया आहेत. एक गाडी सभापतींना, तर दुसरी गाडी संचालक व सचिवांसाठी आहे. मात्र गेल्या दीड-दोन वर्षापासून दुसरी चारचाकी गाडी मिरज सहकारी संस्थांचे उपनिबंधक वापरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीच्या कालावधीत फिरतीसाठी त्यांनी गाडी नेली होती. मात्र ही परिस्थिती संपली तरी अद्याप वाहन त्यांनी बाजार समितीला परत दिले नाही, अशी बाजार समिती पदाधिकारी आणि संचालकांची तक्रार आहे.

Web Title: The vehicle of the market committee has been with the Deputy Registrar for two years