शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत खून का बदला खून; भाजी विक्रेत्याला भरदिवसा बाजारातच संपवले

By घनशाम नवाथे | Updated: June 5, 2025 12:58 IST

वडिलांच्या खुनाचा बदला घेतला, हल्लेखोर पसार

घनशाम नवाथेसांगली : येथील शंभरफुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात महेश प्रकाश कांबळे (वय ३७, रा. इंदिरानगर, सांगली) याचा दोघांनी धारदार शस्त्राने खून केला. मृत महेश याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. २०२१ मध्ये त्याने फिरोज उर्फ बडे शेरअली शेख (वय ४५, रा. जुना कुपवाड रस्ता, सांगली) याचा खून केला होता. मृत फिरोजच्या मुलाने साथीदारासह महेशचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असले तरी अनैतिक संबंधाची किनार देखील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.महेश कांबळे हा भाजी विक्रेता आहे. आर्थिक वादातून त्याने २०२१ मध्ये फिरोज शेख याचा खून केला होता. संजयनगर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता. २०२३ मध्ये महेश हा जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो पुन्हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. गुरूवारी सकाळी तो शंभर फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात गेला होता. त्यावेळी फिरोज याचा मुलगा व अन्य साथीदार त्याच्या मागावर होते. त्यानी दुचाकी शोरूमजवळ महेशवर हल्ला चढवला. हल्ल्यात महेश गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पळाले. हल्ल्यानंतर भाजी बाजारात पळापळ झाली. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय मोरे पथकासह धावले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके पाठवली.प्राथमिक तपासात वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून फिरोज याने साथीदारासह खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतू त्याचबरोबर खून करण्यास अनैतिक संबंधाची किनार असल्याचे कारण पुढे येत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने देखील पोलिस तपास करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस