कवठे एकंद परिसरात भाजीपाला उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:45+5:302021-05-08T04:26:45+5:30

फोटो-०७कवठे एकंद२ : कवठेएकंद येथील नितीन तपासे यांनी काकडीचा प्लॉट विक्री होत नसल्याने सोडून दिला आहे. प्रदीप पोतदार लोकमत ...

Vegetable growers in Kavathe area are facing difficulties | कवठे एकंद परिसरात भाजीपाला उत्पादक अडचणीत

कवठे एकंद परिसरात भाजीपाला उत्पादक अडचणीत

फोटो-०७कवठे एकंद२ : कवठेएकंद येथील नितीन तपासे यांनी काकडीचा प्लॉट विक्री होत नसल्याने सोडून दिला आहे.

प्रदीप पोतदार

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठे एकंद : कडक लॉकडाऊमुळे बाजारपेठ नसल्याने कवठे एकंद (ता. तासगाव) येथील फळ-भाजीपाला उत्पादक अडचणीत आला आहे. ऐन उन्हाळ्यात भाजीपाला शेतातच खराब होऊ लागला आहे.

भाजी मार्केट बंद असल्यामुळे भाजीपाला खरेदी- विक्री होत नाही. स्थानिक बाजारही बंद झाल्याने किरकोळ विक्रीही थांबली आहे. सुरेश दिनकर माळी यांनी द्राक्षबाग काढून दुधी भोपळा, कारले, दोडका अशी लागवड केली आहे. मात्र, मालाला मागणी नसल्याने फळभाज्यांचे नुकसान होत आहे.

नितीन तपासे यांनी ३० गुंठे काकडीचा प्लॉट खप होत नसल्याने सोडून दिला. यासाठी जवळपास चाळीस हजार रुपये खर्च केला होता. सूरज देशमुख यांनी दीड एकर आरती जातीचा दोडका लागवड केली आहे. प्रारंभी ३० रुपये किलो असा दर होता. मात्र, बाजारपेठा बंद झाल्याने विक्री ठप्प झाली आहे.

कोट

भाजीपाला पिकवण्यासाठी बियाणे, रोपे, खत औषधे, तोडणी खर्च, पाणी नियोजन खर्च वाढत आहे. किरकोळ विक्रीतून घातलेला खर्चदेखील निघत नाही. लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाने सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी.

- सुरेश माळी, कवठे एकंद

Web Title: Vegetable growers in Kavathe area are facing difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.